Ads

चंद्रपूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने केंद्र सरकारच्या इंधन दरवाढीच्या विरोधात निषेध




चंद्रपूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने
केंद्र सरकारच्या इंधन दरवाढीच्या विरोधात निषेध!

दिनचर्या न्युज
चंद्रपूर :-
चंद्रपूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मा .जयंतजी पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष राजेंद्रभाऊ वैद्य यांच्या नेतृत्वात " केंद्र सरकारने 25 रुपयाने केल्यामुळे,गॅस, दरवाढीच्या निषेधार्थ जटपुरा गेट महात्मा गांधींच्या पुतळ्याजवळ " " "सिलेंडर दरवाढ मागे घ्या "महंगा सिलेंडर महंगा तेल मोदीजी आप सरकार चालाने मे हो गये फेल "मोदी हटओ देश बचाओ "बेशरम मोदी होश मे आओ जनता से तुम ना टकराओ""असे नारे देत केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला.
केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे गॅस दरवाढ किमती 25रुपयांनी वाढविल्या,त्यामुळे मागील एक वर्षाा पासून कोरोनाच्या संकटामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या सर्व सामन्य जनतेचे कंबरडे मोडण्याचे काम केंद्रातील मोदी सरकारने केले आहे,शंभर रुपयांच्यावर पेट्रोलचे दर गेलेले आहेत. आधीच कोरोनामुळे आर्थिक अडचणीत असलेल्या जनतेचे कंबरड मोडण्याचे काम केले आहे ,ही गॅस दरवाढ तात्काळ मागे कमी करण्याच्या मागणी साठी केंद्र सरकार विरोधात निषेध करण्यात आला. यावेळी जिल्हाध्यक्ष श्री राजेंद्र वैद्य,महिला जिहाध्यक्षा सौ बेबीताई उईके,जिल्ह्यातील जेष्ठ नेते हिराचंद बोरकुटे , जेष्ठ नेते महादेव पीदूरकर , माजी नगराध्यक्ष दीपक जयस्वाल ,जेष्ठ नेते डी .के. आरिकर, सामाजिक न्यायविभागाचे प्रदेशउपाध्यक्ष सुनील दहेगावकर ,सामाजिक न्यायचे जिल्हाध्यक्ष प्रियदर्शन इंगडे, ग्राहक सेलचे जिल्हाध्यक्ष देव कंनाके नगरसेविका मंगलाताई आखरे, जिल्हउपाध्यक्ष डॉ आनंद अडबाले, चंद्रपूर तालुका अध्यक्ष शरद मानकर,राजेंद्र आखरे,वंदना आवळे, दिलीप पीट्टूलवार,प्रमोद देशमुख,मनोहर जाधव ओबीसी तालुकाध्यक्ष,पुरुषोत्तम वाघ,देविदास रामटेके,किशोर आवळे,डॉ रमेश वरहाटे, संपत अरेल्ली, सरस्वती गावंडे,सुमित्रा वैद्य,नीता पिंपळकर,असिफ शेख,विठ्ठल पिंपळकर,यासह शेकडो पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते .

दिनचर्या न्युज

Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment