Ads

_सहा वर्षानंतर उघडणार सुधाकरांची दुकाने_ दुकानांची रंग रंगोटी सुरू!





_सहा वर्षानंतर उघडणार सुधाकरांची दुकाने_
दुकानांची रंग रंगोटी सुरू


दिनचर्या न्युज :-
चिमूर,
चंद्रपूर जिल्ह्यात देशी-विदेशी दारू व बियरबारची दुकाने १ एप्रिल २०१५ ला राज्यात भाजपाची सत्ता स्थापन झाल्याबरोबर काही महिन्यातच बंद झाली. नुकतेच शासनाने जिल्ह्यातील देशी-विदेशी दारू आणि बियरबार सुरू करण्यास परवानगी दिल्याने सहा वर्षानंतर सुधाकरांची ही दुकाने सुरू होणार असून, दुकानांची डागडुजी सुरू झालेली आहे.
माजी मंत्री, आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांना दिलेला शब्द पूर्ण तर केला. मात्र, कायदे कठोर केलेले नव्हते. परिणामी गल्लोगल्ली अवैद्य दारू विक्री करणारे नवयुवक तयार झालेत. त्यामुळे जिल्ह्यात दारूबंदी असूनसुद्धा जिल्ह्यातील प्रत्येक खेडोपाडी, गावांत अवैध विषारी दारू मिळाल्याने सुधाकरांची तृष्णा तृप्त होत असायची. काही सुधाकरांना या विषारी दारूमुळे आपले प्राणसुद्धा गमवावे लागले. यामुळे जिल्ह्यातील दारूबंदी फसवी असल्याचे मत तालुक्यातील वाहानगाव येथील तत्कालीन उपसरपंच प्रशांत कोल्हे यांनी मांडले होते. 'जिल्ह्यातील दारूबंदीचे नियम व कायदे कठोर व कडक करा? नाहीतर चंद्रपूर जिल्ह्यातील फसवी दारुबंदी पुन्हा सुरू करा?', असा पवित्रा प्रशांत कोल्हे यांनी सण २०१६-१७ मधे घेतला होता. नाहीतर वाहांनगाव ग्रामपंचायतमध्ये खुली दारूविक्री करण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी करीत खुली दारूविक्री करण्याचे सुद्धा वाहानगाव ग्रामपंचायतने सुरवात केली होती. याकडे तेव्हा संपुर्ण महाराष्ट्र राज्याचे लक्ष चिमूर तालुक्यातील वाहानगाव या छोट्याश्या गावाकडे वेधल्या गेले होते.
चंद्रपूर जिल्ह्यातील फसवी दारू खुली करावी याकरिता वाहानगावचे तत्कालीन उपसरपंच प्रशांत कोल्हे यांनी दारूविक्रीचे आंदोलन सुरू केले होते. यासाठी कोल्हे यांना शासनाने काही महिन्यांसाठी तडीपार सुद्धा केले होते. मात्र, चंद्रपूर जिल्ह्यातील फसवी दारूबंदीचा लढा त्यांनी अविरत सुरू ठेवला होता. याकरिता त्यांनी देशाचे पंतप्रधान, राज्याचे मुख्यमंत्री, राज्यपाल यांना अनेक निवेदने पाठवली. दरम्यान, जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी जिल्ह्यातील दारुबंदी उठवली. त्यामुळे गत सहा वर्षांपासून बंद असलेली देशी-विदेशी दारू व बियरबारचे दरवाजे आता सुधाकरांसाठी खुली होणार आहेत.
       अधिसूचना व नूतनीकरण सुरू झाल्याने सहा वर्षांपासून बंद असलेले दुकानांची साफ सफाई व डागडुजी सुरू झाली आहे. जिल्ह्याची दारुबंदी उठवल्यामुळे अवैधरित्या करीत असलेल्या दारूविक्रेत्यांचे चेहरे कोमेजलेले असतांना दारुविक्रेत्यांचे चेहरे मात्र फुलल्याचे दिसत आहेत.
       चंद्रपूर जिल्ह्याची फसव्या दारुबंदी बाबत मी वाहानगावात आंदोलन केले. ही बंदी उठविण्यात यावी, याकरिता मी लढा दिला. यात संपूर्ण महाराष्ट्र राज्याचे लक्ष वाहानगावाकडे लागले होते. मला तडीपार सुद्धा करण्यात आले होते. त्या आंदोलनाचे फलित झाले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील दारुबंदी उठविण्यात आल्याने अवैध दारूविक्रीवर आढा बसेल, जिल्ह्याच्या महसुलातही वाढ होईल.
         - प्रशांत कोल्हे
     सरपंच ग्रा. पं. वाहानगाव, ता. चिमूर.
तथा मनसे जिल्हा उपाध्यक्ष, चंद्रपूर.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment