जिल्ह्यातील अवैध जुगार अड्ड्यांवर लाखोंची उलाढाल!
राजकीय वरदहस्त असलेल्यांचे जुगार अड्डे पोलिसांच्या आशीर्वादाने कार्यरत !
दिनचर्या न्युज
चंद्रपूर (वि.प्र..)
राजुरा तालुक्यात अशा जुगार अड्ड्यांची भरमार आहे, असे सांगितले जाते. जिल्ह्यात दारू बंदी उठल्यानंतर या जुगार अड्डा मध्ये वाढ झालेली आहे, ही बाब नाकारता येत नाही. नशेमध्ये जुगार खेळणाऱ्यांना हार-जितीचा भान नसतो. याचाच फायदा उचलून जुगार अड्डे चालविणारे लाखो रुपये ऐठून घेतात.
नुकतेच वरोरा येथील शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नितीन मत्ते यांच्या जुगार अड्ड्यावर जुगार जिंकल्यानंतर जूगार जिंकणाऱ्यास मारझोड झालेला प्रकरण उघडकीस आला व त्यानंतर पोलिसांनी उशिराजुगारअड्डाचालविणाऱ्यांविरोधात अटकसत्राची मोहीम राबविली. लाखोंची उलाढाल असलेल्या या अवैध जुगार अड्ड्यांकडे त्या-त्या क्षेत्रातील पोलीस आर्थिक उलाढाली मुळे दुर्लक्ष करीत असतात, हे वरोरा येथे घडलेल्या प्रकरणानंतर लक्षात येत आहे.
लाखोची उलाढाल असलेल्या अवैध जुगार अड्डयाची जिल्ह्यामध्ये भरमार आहे. प्रत्येक तालुक्यामध्ये जुगार अड्डे खुलेआम सुरू असल्याचे सांगण्यात येते. महत्त्वाचे म्हणजे ज्या जुगार अड्डा मालकांना राजकीय वरदहस्त आहे. त्यांचेच जुगार अड्डे या जिल्ह्यात सुरू आहे. चंद्रपूर जिल्ह्यात दारू सुरू झाल्यानंतर अवैध दारू विक्रीला थोडासा कां असेना आळा मिळाला. अवैध दारूविक्री नंतर काही बेईमान पोलिसांपाशी दारू विक्रीतून मिळणारा पैसा आता बंद झाला आहे, त्यामुळे जिल्ह्यामध्ये अवैध मार्गाने सुरू असलेल्या व्यवसायातून आपली कमाई करण्याचे साधन बेईमान पोलीस शोधत आहे, हे सत्य कुणीही नाकारू शकत नाही. वरोरा तालुक्यामध्ये एका राजकीय पुढाऱ्याच्या जुगार अड्ड्यावर झालेली घटना हा याचा सबळ पुरावा आहे. जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यात ब्रम्हपूरी, चिमूर, राजुरा, कोरपना, मूल, सिंदेवाही, नागभीड बल्लारपूर, सावली, गोंडपिपरी, या प्रत्येक शहरात तालुक्यांमध्ये असेच जुगार अड्डे खुलेआम सुरू असल्याची अधिकृत माहिती आहे.
राजुरा तालुक्यात अशा जुगार अड्ड्यांची भरमार आहे, असे सांगितले जाते. जिल्ह्यात दारू बंदी उठल्यानंतर या जुगार अड्डा मध्ये वाढ झालेली आहे, ही बाब नाकारता येत नाही. नशेमध्ये जुगार खेळणाऱ्यांना हार-जितीचा भान नसतो. याचाच फायदा उचलून जुगार अड्डे चालविणारे लाखो रुपये ऐठून घेतात.
जिल्ह्यात सूरू असणाऱ्या अशा जुगार अड्ड्यांवर चंद्रपूर जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक यांनी स्वतः लक्ष द्यायला हवे अशी मागणी आता जनतेमध्ये होऊ लागली आहे.
0 comments:
Post a Comment