गोंडपिपरी:-गोंडपिपरी तालुक्याच्या एका टोकावरील अंधारी नदी किनाऱ्यावर वसलेल्या लिखितवाडा गावात स्वातंत्र्यप्राप्तीनंतर कधीच बससेवा पोहोचली नाही .मात्र गावातील ऍक्टिव्ह ग्रामपंचायत पदाधिकारी सरपंच भाग्यश्री आदे,उपसरपंच हरिदास मडावी,सदस्य कोमल फरकडे,भारत कोहपरे,पुष्पा राऊत,प्रतिभा चंद्रगिरीवार,मायाबाई कोहपरे या पदाधिकाऱ्यांनी जबाबदारी पेलत गावात बस सेवा पोहचण्यासाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा केला .त्यांच्या पाठपुराव्याला यश आले असून पहिल्यांदाच शासनाची एसटी बस धावली.
लिखितवाड्यातील विध्यार्थी मोठ्या संखेने उच्च शिक्षणासाठी गोंडपिपरी जातात.दररोज त्यांना चार किलोमीटर पायदळ जाऊन वढोली गाठून पुढील प्रवास करावा लागत होता.विधयार्थ्यांसह गावकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात हाल व्हायचे.त्याचीच दखल घेऊन गावातील ऍक्टिव्ह पदाधिकाऱ्यांनी बस आगार प्रमुख यांच्याकडे वारंवार पाठपुरावा केला त्यांना यश आले असून दि.२१ गुरुवारी एसटी पोहचली गावात आनंदाचे वातावरण असून गावकऱ्यांनी जल्लोष साजरा केला.ST reached Likhitwada for the first time after independence
0 comments:
Post a Comment