Ads

शहीद बाबुराव शेडमाके पुण्यतिथी कार्यक्रम संपन्न

चंद्रपूर :-
शहीद भुमी जिल्हा कारागृह, चंद्रपूर येथे या वर्षी सुद्धा शहीद बाबुराव शेडमाके समितीच्या वतीने शहीद दिनानिमित्य विनम्र अभिवादन करण्यासाठी पुष्पचक्र अर्पन कार्यक्रम घेण्यात आला कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीची जाणीव ठेऊन मोठ्या प्रमाणात रॅलीचे व मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन न करता साध्या पद्धतीने अभिवादन करण्यात आले.

शहीद विर बाबुराव शेडमाके यांना पिंपळाच्या झाडाला फाशी देण्यात आलेल्या ऐतिहासिक वृक्षाला समितीचे अध्यक्ष दयालालजी कन्नाके यांच्या शुभहस्ते पुष्प चक्र अर्पन करण्यात आले व सप्तरंगी ध्वज फळकविण्यात आला तेव्हा उपस्थितांनी बाबुरावजी शेडमाके अमर रहे, सेवा सेवा जय सेवा अशा उद्घोषनाने विनम्र अभिवादन करण्यात आले. तेव्हा त्या प्रसंगी समितीचे उपाध्यक्ष विलास मसराम, सचिव साईराम मडावी, कोषाध्यक्ष गणेश गेडाम, सदस्य श्याम गेडाम, शशिकला गेडाम, सविता विलास मसराम, यांची उपस्थिती होती. तेव्हा ऐतिहासीक वृक्षाला हंसराज अहीर माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री यांनी सुद्धा प्रामुख्याने उपस्थिती दर्शविली. व वृक्षाला माला अर्पन केली तसेच भाजपा महानगर अध्यक्ष डॉ. गुलवाडे, महापौर सौ. राखीताई कंचर्लावार, उपसभापती महिला व बाल कल्याण मनपा चंद्रपूर कुमारी शितल कुळमेथे, माजी उपमाहापौर अनिल फुलझेले, कोषाध्यक्ष प्रकाश धारणे, महामंत्री रविंद्र गुरूनुले, अनुसूचित जमाती मोर्चा अध्यक्ष धनराज कोवे, नगर सेविका चंद्रकला सोयाम, ज्योति गेडाम, शितल आत्राम, माया उईके, नगरसेवक देवानंद वाढई, प्रमोद बोरीकर, विजय कुमरे, डॉ. मधुकर कोटनाके, अशोक तुमराम, कमलेश आत्राम, विनोद शेरकी, शुभम गेडाम, मंजुश्री कासनगोहूवार, प्रज्ञा बोरगमवार, राजेंद्र खांडेकर, रामकुमार आकेपल्लीवार, रेखा मडावी, गिता गेडाम, कोमल राजगडकर, अरविंद मडावी, विक्की मेश्राम, रविंद्र तुमराम सुरज सोयाम, राजु घरोटे, विट्ठल कुमरे, राधाबाई सिडाम, शाम मरस्कोल्हे, शशिकला उईके, बापुजी गेडाम, रविंद्र तुमराम, गणेश तुमराम, धर्मा गेडाम, सुधा आत्राम, जयश्री आत्राम, महिपाल गेडाम यांचेसह इतर आदिवासी विविध संघटनांच्या वतीने व आदिवासी समाज बांधवांनी विनम्र अभिवादन केले.Martyr Baburao Shedmake Punyatithi program concluded

Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment