विसापूर :- गावातील पांदण रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था असल्यामुळे त्याचे खडीकरण करण्यात यावे यासाठी वारंवार महाराष्ट्र शासनाकडे गावातील शेतकऱ्यांनी मागणी केली होती. परंतु शासनाने याकडे चक्क दुर्लक्ष केल्याने पांदण रस्त्यामुळे एका शेतकऱ्याचा नाहक बळी गेला.
विसापूर येथील गजानन राजेश्वर पाटणकर (६०) बुधवारला नित्याप्रमाणे आपल्या शेतात कापूस वेचत असताना दुपारी २-०० वा. अचानक त्यांच्या छाती मध्ये वेदना निर्माण झाल्या व त्यांना हृदयविकाराचा झटका आला. शेतापर्यंत खराब पांदण रस्त्यामुळे कोणतेच वाहन नेता येत नसल्याने बैलगाडीच्या साह्याने त्यांना विसापुरातील खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले. परंतु रुग्णालयात आणण्यास फार विलंब झाल्यामुळे वाटेतच त्यांची प्राणज्योत विझली. तात्काळ उपचार न मिळाल्यामुळे त्यांचावर मृत्यू ओढवला असे डॉक्टरचे मत होते. जगाचा पोशिंदाचा शासन विचार करत नाही कधी त्याला आत्महत्या करावे लागते तर कधी स्वत:च्या हक्कासाठी लाठी खावे लागते. त्याला आपल्या पिकवलेल्या ध्यानाचे भाव ठरविता येत नाही.
आज जर पांदण रस्ता सुरळीत असता तर थेट त्यांच्या शेतापर्यंत ॲम्बुलन्स पोचली असती व त्यांचा जीव वाचला असता.आतातरी शासनाने गांभीर्याने लक्ष देऊन पांदन रस्त्याचे खडीकरण व मजबुतीकरण करावे व उघड्यावर पडलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबाला आर्थिक मदत द्यावी अशी मागणी गावातील शेतकऱ्यांनी शासनाकडे केली आहे.
0 comments:
Post a Comment