Ads

चकपिरंजी, भट्टीजांब, उसेगाव, रुद्रापूर, सावली येथे कॅन्सरग्रस्त व अपंगांना पालकमंत्री नामदार विजय भाऊ वडेट्टीवार यांचेकडून आर्थिक मदत.

सावली ( प्रतिनिधी ):-
राजकारण करीत असताना समाजकारणही तितकेच महत्वाचे असते असा विचार मनात ठेवून कार्य करणाऱ्या माननीय विजय भाऊ वडेट्टीवार यांच्या सामाजिक कार्याची प्रचिती पुन्हा एकदा पाहायला मिळाली. सावली तालुक्यातील काही कॅन्सरग्रस्त रुग्णांना मदत करून त्यांनी आपल्या सामाजिक बांधिलकी जोपासण्यासाचा प्रयत्न केला
माननीय नामदार विजय भाऊ वडेट्टीवार हे नुकतेच सावली तालुका दौऱ्यावर आले असता चकपिरंजी, भट्टीजांब, उसेगाव, रुद्रापूर, सावली येथील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी कॅन्सरग्रस्त व अपंग रुग्णांची माहिती माननीय नामदार विजय भाऊ वडेट्टीवार यांना दिली. तत्काळ पालकमंत्री नामदार विजय भाऊ वडेट्टीवार यांनी कार्यकर्त्यांच्या मदतीने आर्थिक मदत पाठविली
यासंबंधात सविस्तर वृत्त असे की, चकपिरंजी येथील राजाराम हुमने व त्यांची पत्नी दोघेही आंधळे आहेत. त्याचा एकुलता एक मुलगा अचानक मरण पावला कुटूंबातील प्रमुख व्यक्ती मरण पावला. त्यामुळे दुःखाचे डोंगर कोसडले अंध मतापित्याना मदत करणे आवश्यक होते माननीय नामदार विजय भाऊ वडेट्टीवार यांना सदर बाब माहीत होताच त्यांनी तत्काळ मदत पाठविली सदर मदत चकपिरंजी गावच्या प्रथम नागरिक उषा रजनीकांत गेडाम ,माजी सरपंच परशुराम वाडगुरे व सुरेश निरुडवार यांचे हस्ते देण्यात आली
यावेडी तालुका काँग्रेस चे अध्यक्ष नितीन गोहणे, नकटू पोहनकार, रमेश कोवे, गजानन राऊत, उपस्थित होते
भट्टीजांब येथे रत्नमाला योगीनाथ भोयर ही महिला कॅन्सर या आजाराने आजारी होती. घरची परिस्थिती अत्यंत बेताची. त्यामुळे सदर महिलेला पुढील उपचाराकरिता आर्थिक मदत देण्यात आली
उसेगाव येथे तुडसाबई धनराज गोहणे ही महिला कॅन्सर या रोगाने आजारी होती तिलाही आर्थिक मदत देण्यात आली
रुद्रापूर येथील केशव भिवाजी उरकुडे हा व्यक्ती आंधळा असून त्याला एक मुलगा होता. मुलाचे नुकतेच अपघातामध्ये दुःखद निधन झाले. दुसरी मुलगीही आंधळी असून कुटूंबातील प्रूमुख व्यक्ती चे निधन झाल्यामुळे कुटूंबावर संकट कोसडले होते सदर आंधड्या व्यक्ती ला आर्थिक मदत करण्यात आली. तर रुद्रापूर येथील अपंग व्यक्ती नामे पुरुषोत्तम गोविंदा येलेकर यालाही आर्थिक मदत देण्यात आली
सावली येथील व्यक्ती रोशन मोरेश्वर कावळे हा मुलगा विद्युत शॉक ने 90 टक्के जडला होता पुढील उपचाराकरिता त्याला आर्थिक मदत देण्यात आली सदर मदत सावली शहर काँग्रेसचे अध्यक्ष विजय मुत्यालवर, नितीन दुवावार,सावली शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षा भारती चौधरी, विलास यासलवर, गुणवंत सुरमवार, चंद्रकांत गेडाम,आकाश खोब्रागडे, प्रितम गेडाम, प्रशांत राईचवार, मनोज चौधरी सुनील ढोले बबन वाढई, भोगेश्वर मोहूर्ले, नितेश रसे, यांच्या प्रमुख उपस्थितीत देण्यात आली
दरम्यान भट्टीजांब, उसेगाव, रुद्रापूर, येथे आर्थिक मदत देतांना सावली तालुका काँग्रेसचे अध्यक्ष नितीन गोहणे, संजय गांधी निराधार कमिटीचे सदस्य अनिल पाटील मशाखेतरी, उसेगावचे प्रथम नागरिक चक्रधर दुधे, उपसरपंच सुनील पाल, भट्टीजांब येथील काँग्रेसचे कार्यकर्ते हरिदास मेश्राम, शरद शेडमाके, चकपिरंजी येथील माजी सरपंच परशुराम वाडगुरे, किशोर पाटील घोटेकर, रामदास गोहणे तंटामुक्ती अध्यक्ष उसेगाव, नरेंद्र अभारे, रुद्रापूर येथील काँग्रेसचे कार्यकर्ते गुणाजी पाल, कृपाचार्य चुदरी, प्रभाकर कुकुडकर, इत्यादी काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment