Ads

स्वा. सावरकरांच्या प्रेरणेतून व्यायामशाळेद्वारा ,बलशाली, निरोगी व देशभक्त युवक घडतील - हंसराज अहीर.

चंद्रपूर -
स्वातंत्रयवीर वि.दा. सावरकर यांच्या कार्यातुन प्रेरणा घेत नवनिर्मित व्यायामशाळेतून बलशाली, निरोगी व देशभक्त युवक तयार होतील. धगधगते अग्नीकुंड असलेल्या देशभक्त वि. दा. सावरकरांच्या नावाने असलेल्या या व्यायामशाळेचा उपयोग वार्डातील सर्व नागरीकांनी घ्यावा. बलशाली व आरोग्य संपन्न युवक हिच राष्ट्राची मौल्यवान संपत्ती असल्याने तरूणांनी व्यायामाला प्राधान्य देत आपले आरोग्य अबाधित राखावे असे आवाहन पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्राी हंसराज अहीर यांनी स्वा. सावरकर व्यायामशाळा इमारतीच्या लोकार्पण सोहळ्यात केले. या लोकार्पण सोहळ्यामध्ये कसलेही राजकारण नसुन केवळ लोकांच्या आग्रहास्तव हे लोकार्पण करण्यात आले अअसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
संन 2018 -19 अंतर्गत खासदारांच्या स्थानिक विकास निधी अंतर्गत 26 लाख रूपये निधीनी बांधण्यात आलेल्या स्वातंत्रयवीर वि.दा. सावरकर व्यायामशाळा इमारतीचे लोकार्पण दि. 27 आॅक्टो. रोजी श्री अहीर यांचे शुभहस्ते पार पडले त्याप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमासपूर्व महापौर सौ. अंजलीताई घोटेकर, खुशाल बोंडे, राजेश मुन, अनिल फुलझेले, संदीप आवारी, भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष रघुवीर अहीर, रविंद्र गुरणुले, मोहन चैधरी, सुभाष कासनगोट्टुवार, विठ्ठल डुकरे, पुष्पा उराडे, मायाताई उईके, शिलाताई चव्हान, शितल गुरणुले, वनीताताई डुकरे, शाम कनकम आदी मान्यवर उपस्थित होते.
स्वातंत्रयवीर सावरकर युवकांचे प्रेरणास्त्रोत व देशभक्तीचे प्रतिक होते. महापालिकेने प्रस्ताव घेवून सर्वानुमते या इमारतीला सावरकरांचे नाव दिले त्याबद्दल आभार मानतो असे सांगत अशा राष्ट्रीय विभुतींच्या राष्ट्रसमर्पित कार्याचा गौरव व प्रेरणा म्हणुन महानगरातील शिवाजी चैक, शहिद बाबुराव शेडमाके शहिदस्थळ, बाबुपेठ येथील नेताजी सुभाष चैकाचे खासदार निधीतुन विकास व सौदर्यीकरण केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी व पूर्व मुख्यमंत्राी देवेंद्र फडणवीसांच्या काळात लोकहिताची कामे प्रभावीपणे झाली व होत आहेत. भाजपाच्या नेतृत्वातील मनपा व्दारे चंद्रपुरात सर्वत्रा विकास कामे होत आहेत. अमृत नळयोजनेमुळे पुढील 30 वर्ष पेयजलाची कमतरता भासनार नाही. देशात शंभर कोटी लसीकरण हे फार मोठे यश असल्याचेही त्यांनी यावेळी सांगीतले.
याप्रसंगी सौ. अंजलीताई घोटेकर, स्थायी समिती सभापती संदीप आवारी, अनिल फुलझेले, सुभाष कासनगोट्टुवार, मायातई उईके यांनीही समयोचित मार्गदर्शन केले. कार्यक्रमात ज्येष्ठ नागरीकांचा हंसराज अहीर व मान्यवरांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी चंद्रप्रकाश गौरकर, निलेश हिवराळे, मायाताई मांदाडे, वंदना संतोशवार, श्रीकांत भोयर, पुरूषोत्तम सहारे, देवेंद्र मोगरे, अरूण तीखे, प्रमोद शास्त्राकार, अमीन शेख, धनराज कोवे, विनोद शेरकी, राजु घरोटे, मनोहर राऊत, सपना नामपल्लीवार, अरूणा चैधरी,पुरूषोत्तम सहारे, संजय खनके, पुनम तिवारी, गिता गेडाम, सिमा मडावी, ममता फाये, माया कोटगिलवार, मंगला शास्त्राकार, सिंधु चैधरी, चंदा ईटनकर, संगिता पिंपळशेंडे यांच्यासह भाजप पदाधिकारी, मंडळ अध्यक्ष व कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन बुक्कावार यांनी तर आभार प्रदर्शन विठ्ठल डुकरे यांनी केले
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment