Ads

10 दिवसांपासून बल्लारपूर पोस्टाची लिंक फेल

Link failed in Ballarpur Post office form10 days
बल्लारपूर (प्रतिनिधी):-मागील 10 दिवसांपासून येथील पोस्ट ऑफिसचे संगणक व लिंक काम करीत नसल्यामुळे बल्लारपूर शहरातील हजारो खातेदारांचे कोट्यावधी रुपयांचे व्यवहार ठप्प झाले आहेत. 30 तारखेच्या आत आरडीची सूची भरली नाही, तर आम्हाला त्याचे व्याज भरावे लागेल, या चिंतेत अल्पबचत अभिकर्ता सापडला आहे. मात्र, अजूनही पोस्ट खात्यातील वरिष्ठ अधिकारी यांचे डोळे उघडले नाही. यामुळे हजारो खातेदार संताप व्यक्त करीत आहे.
शहरात अनेक अल्पबचत अभिकर्ता आहे. त्यांच्याकडे हजारोंच्या संख्येने पोस्टातील विविध योजनांमध्ये पैसे भरणारे खातेदार आहेत. त्यापैकी पीपीएफ व आर.डी. योजनेत पैसे भरणा-यांची संख्याही जास्त आहे. गेल्या 10 दिवसांपासून सर्व अल्पबचत अभिकर्ता पोस्टात येवून दररोजचे व्यवहार करण्यासाठी येत आहेत. परंतु, बचत बैंक, आरडी, फिक्स डिपॉजिट, स्पीड पोस्ट, पार्सल सेवा, डाक टिकट सर्व सेवा दहा दिवसा पासून बंद आहे. त्यामुळे लोकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
सोमवार पर्यंत सेवा सुरू न झाल्यास दुपारपासून पोस्ट ऑफिसच्या समोर खातेदारांद्वारे धरणे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा सर्व पोस्टातील खातेदारांनी डाक विभागच्या वरीष्ठांना अधिका-यांना दिला आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment