Ads

ब्रम्हपुरी पैलवानांची महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा पुणे 2021 साठी निवड.

Selection of Bramhapuri Wrestlers for Maharashtra Kesari Wrestling Competition Pune 2021-

ब्रम्हपुरी: नुकत्याच झालेल्या विठ्ठल व्यायामशाळा चंद्रपूर येथे पार पडलेल्या महाराष्ट्रराज्य परिषदेच्या मान्यतेने चंद्रपूर जिल्हा कुस्तीगिर संघाच्या वतीने कोविड-19 च्या नियमांचे पालन करुन, जिल्हा निवड चाचणी स्पर्धा सब ज्युनिअर मुले व मुली, वरिष्ठ पुरुष गट गादी व माती विभाग तसेच लक्षवेधक महाराष्ट्र केसरी खुला गट विभागात ब्रम्हपुरी तालुका कुस्तीगीर संघानी उत्कृष्ट डावांचे प्रदर्शन करीत यश प्राप्त केले. विजयी कुस्तीगीरांचे बालेवाडी स्टेडियम पुणे येथे होणाऱ्या ६५ व्या महाराष्ट्रराज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धे करिता निवड करण्यात आली आहे.
सदर निवड महाराष्ट्र केसरी गादी विभागात-पै.अंकुश युवराज राखडे 61 किलो, पै. अंकित रंगराव दोडके 65 किलो, पै. चेतन सुनिल दिवटे, 70 किलो, तर स्पर्धेचे मान असलेल्या महाराष्ट्र केसरी गटात पै. विनित पंडित मेश्राम 125 किलो या मल्लानी गटावर ताबा ठेवत चंद्रपूर संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे. सब ज्युनिअर मुले गटात पै. शुभम शंकर मंडल 60 किलो वर्ग 11 वी तर सब ज्युनिअर मुली गटात पै. कु. नंदिनी राजु थापा 73 किलो वर्ग 11 वी या मल्लांनी विजय प्राप्त केले. या सर्व पैलवानांचे मार्गदर्शक तथा प्रशिक्षक मा. पै. विनोद नामदेव दिवटे हे नियमित सराव कुस्ती आखाडा डाॅ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालय ब्रम्हपुरी येथे नियमित सराव घेत आहेत. सर्व मल्लांचे व प्रशिक्षकाचे हार्दिक अभिनंदन करीत मा. विलास विखार बांधकाम सभापती न. प.ब्रम्हपुरी, मा. दिपकजी ऊराडे उद्योजक,मा. अनिल कांबळे सर मुख्याध्यापक डॉ बाबासाहेब आंबेडकरा विद्यालय ब्रम्हपुरी, मा. प्रितेश येरमे सर (आर.आय), मा. मोंटुभाऊ पिलारे, तसेच मा. कृपालभाऊ मेश्राम अनिलजी नाकाडे सर, राजु आमले सर, सुभाष माहोरे,प्रशांत मेश्राम सर, मुकेश जाधव सर आणि सह प्रशिक्षक पै. अमोल ठेंगरी यांनी प्रथम, द्वितीय व सहभागी मल्लांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. सामान्य परिस्थितीशी लढा देणाऱ्यां अस्सल ग्रामीण मातीतील पैलवानांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment