शेगांव प्रतिनिधी :-पोलीस स्टेशन शेगांव येथील ठाणेदार सपोनि अविनाश मेश्राम, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार राकेश तुरणकर यांनी पोलीस स्टेशनला प्राप्त मोबाईल मिसिंग तक्रारी मधील एकूण 12 मोबाईल फोनचा शोध घेतला त्यामधील 1) मनोज वाकडे, 2) प्रदिप जिवतोडे, 3) विश्वंबर मंगाम, 4) सचिन वाघमारे, 5) वैभव गुळधाने, 6) प्रशांत दडमल, 7) निलेश अमबत्तावार, 8) मुस्ताफ खान, 9) होमराज खाटीक, यांना पोलीस स्टेशनला बोलावून सपोनि अविनाश मेश्राम यांचे हस्ते त्याचे मोबाईल फोन परत करण्यात आले.
मात्र उर्वरित तीन व्यक्तींचे मोबाईल शेगाव पोलीस स्टेशन ला आहेत. त्यामध्ये 1) प्रविन ज्ञानेश्वर धनकी, 2) गणेश मोहुर्ले, 3) महेश आसुटकर, यांचेशी संपर्क साधता न आल्याने त्यांचे मोबाईल हे पोलीस स्टेशनला जमा असुन त्यांना माहीती मिळताच पोलीस स्टेशनला येवून मोबाईल घेवून जावे. असे आवाहन शेगाव पोलीस स्टेशन चे ठाणेदार अविनाश मेश्राम यांनी केले आहे.
0 comments:
Post a Comment