बल्लारपूर :- श्री लक्ष्मी नरसिंग नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने बल्लारपूर पोलीस ठाण्यात धनत्रयोदशीच्या सायंकाळी शांती नगरातील गरीब मुलांसोबत दिवाळी साजरी करण्यात आली. या महोत्सवात ठाणेदार उमेश पाटील, माजी नगरसेविका वर्षा सुंचुवार, अंध शिक्षक सतीश शेंडे, देवा व्हटकर, सतीश राजूरकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
बल्लारपूर पोलीस शांतीनगर येथे अत्यंत गरीब कुटुंब राहतात. त्यांना दिवाळीतही चांगले जेवण आणि मिठाई मिळत नाही. ही बाब लक्षात घेऊन श्री लक्ष्मी नृसिंह नागरी सहकारी पतसंस्थेने त्यांच्यासाठी पोलीस ठाण्यात दिवाळी सणाचे आयोजन केले होते. लहान मुले व महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. पाहुण्यांनी सर्वांना मार्गदर्शन केले, दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासारखा होता. कार्यक्रमाचे संचालन श्रीनिवास सुचुवार यांनी केले. त्यांनी कार्यक्रमाची उद्दिष्टे सांगितली. यावेळी मुलांचा आनंद पाहण्यासारखा होता.Diwali celebration with poor children at Ballarpur police station
0 comments:
Post a Comment