पोंभूर्णा:- दुर्योधन घोंगडे:-एन हाताशी आलेल्या भात पिकावर अकाली पावसाच्या सरी नी हजेरी लावल्याने पोंभूर्णा तालुक्यातील शेतकऱ्यांचे धान पीक मोठ्या प्रमाणात पाण्यात भिजले असून अतोनात नुकसान झाले आहे. यात शेतकरी पुरता खचला असून शासनाने याची गंभीर दखल घेत शेतीची पाहणी करून तात्काळ नुकसान ग्रस्त शेतकऱ्याला भरपाई द्यावी अशी मागणी पोंभुर्णा शहर व तालुक्यातील ग्रामीण पदाधिकाऱ्यांच्या वतीने करण्यात येत असून तसे निवेदन तहसीलदार मार्फत शासनाकडे पाठवण्यात आले आहे.
यावर्षीच्या पावसाने सुरुवातीला हुलकावणी दिली मात्र नंतर शेतकऱ्यांना अवशकते प्रमाणे पावसाने हजेरी लावल्याने मोठा दिलासा मिळाला. त्यामुळे यावर्षी शेतकऱ्याला धानाचे पीक चांगले मिळेल अशी अपेक्षा होती. धान पीक फुटव्यावर आला कापणीस झाला काहींनी कापून सर्ड्या ठेवल्या, काहींच्या अर्धवट दिबल्या तर काहींच्या उभे पीक होते. हवामान खात्याने अंदाज वर्तविला प्रमाणे मोसम तसा खराब झालेलाच पण एक मन आहेना की ''कहू तो माय मरजाय, ना कहु तो बाप कुथा खा जाय' तशीच अवस्था शेतकरी वर्गाची आहे. धान नाही कापले तर धान भूर्डा होऊन खाली पडून खराब होईल आणि कापले तर पावसाने खराब होतील , शेवटी करायचे काय असा मोठा गंभीर अवस्था शेतकरी वर्गाची होते.
गेल्या काही दिवसापासून पावसाने आपले रुद्र रूप धारण केले असताना गेल्या दोन दिवसापासून अकाली जोरदार हजेरी लावल्याने पोंभूर्णा तालुक्या सह अनेक तालुक्यातील शेतात पावसाचे पाणी साचले असून शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यात शेतकरी पुरता खचला असून हवालदिल झाला आहे. हातात आलेले पीक एका दमात उध्वस्त झाल्याने आर्थिक, मानसिक, शारीरिक व सामाजिक रित्या खचला असून जगावं की मरावं अशी स्थितीत आहे.
तरी शासनाने या गंभीर बाबीची दाखल घेत तात्काळ शेतीचे पंचनामे करावे व नुकसान ग्रस्त शेतकऱ्यास त्वरित नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी जोर धरत असून त्याबाबतीचे निवेदन देण्यात आले आहे. त्यावेळी पोंभूर्णा भाजपा पक्षाचे शहरी तसेच ग्रामीण पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्तिथ होते.
0 comments:
Post a Comment