भद्रावती (तालुका प्रतिनिधी):-१५ आणि १६ नोव्हेंबर रोजी दरवर्षी पिपरी (देश) येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ५३ वी पुण्यतिथी निमित्त ग्राम स्वच्छता अभियान व पुण्यतिथी सोहळा आयोजित करण्यात आला. प्रबोधनकार सप्तखंजरी वादक उदयपाल महाराज यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम घेण्यात आला. गोपालकाल्या वेळी ह भ प खिरटकर महाराज यांनी कीर्तन केलं.गावातून उस्पुर्तपणे भाजनाच्या गजरात पालखी काढण्यात आली.तसेच कोरोणा काळात गावकऱ्यांच्या मदतीला धावून येणारे कर्तव्यदक्ष अधिकारी नारायण निंबाळकर साहेब यांचा सत्कार करण्यात आला.विविध कार्यक्रमात मोलाचं योगदान देणाऱ्या बालगोपाल मंडळींचा सुद्धा सत्कार करण्यात आला.प्रा अघळते सर वणी, ग्रामगीताचार्य दहेकर मॅडम,श्री ठेंगणे सर यांनी श्रध्दांजलीपर मार्गदर्शन केलं.तसेच विविध महिला व पुरुष भजन मंडळींनी सहभाग घेतला.दोन दिवस गावात उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.गावातील नागरिकांनी उस्पूर्तपणे सहभाग घेतला.नगरभोजनाच्या कार्यक्रमानंतर पुण्यतिथी सोहळ्याची सांगता करण्यात आली.
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
0 comments:
Post a Comment