ढोरवासा केंद्रांतर्गत सर्व शाळांमध्ये पाणी अडवा, पाणी जिरवा उपक्रम राबविण्यात आला .
चंद्रपुर :- दिनांक 15 नोव्हेबर 2021 ला ढोरवासा केंद्रांतर्गत शासन निर्णयानुसार "पाणी अडवा, पाणी जिरवा" या उपक्रमांतर्गत जि.प. उ. प्राथ. शाळा ढोरवासा, मूरसा, गवराळा, कुनाडा, देऊळवाडा, डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यालय मुरसा, कर्मवीर विद्यालय गवराळा या शाळांनी वनराई बंधारा बांधण्यात आला. विद्यार्थ्यांना श्रमदान व पाण्याचे महत्व पटवून देण्यासाठी सहशालेय उपक्रम राबविण्यात आला.शालेय विद्यार्थी, शिक्षक व शालेय व्यवस्थापन समिती चे पदाधिकारी व सदस्य यांच्या संयुक्त मदतीने शाळानिहाय आपआपल्या शिवारात वनराई बंधारा बांधण्यात आला. अशी माहिती ढोरवासा केंद्राचे केंद्र प्रमुख श्री भारत गायकवाड कळवितात.
0 comments:
Post a Comment