मुल प्रतिनिधी :-सत्तेत असणाऱ्यांना बाजूला ठेवण्यासाठी राष्ट्रवादीने पुढाकार घेतला नसता, तर तुमची दुकानदारी चालू झाली नसती असा प्रश्न महाविकास आघाडीत सहभागी असणाऱ्यांना राष्ट्रवादी कांग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी जाहीर सभेत केला. तसेच केंद्रात भाजपची सत्ता असल्यामुळे महाराष्ट्रातील GSTचे हजारो कोटी रुपये दिले नसल्यामुळे आज राज्य अडचणींचा सामना करीत आहे. त्यामुळे पेट्रोल, डिझेल, गॅस, भाववाढ झाली आहे. तेही कमी करण्याचा प्रयत्न महाविकास आघाडी करणार असल्याचे सांगितले. ओबीसींचे कमी केलेले आरक्षण आमचे मंत्री छगन भुजबळ साहेबांनी पुढाकार घेऊन पूर्ववत केले. चंद्रपूर जिल्हा हा देशाच्या राजकारणातला महत्वाचा जिल्हा आहे. स्वातंत्र्य चळवळीचा जिल्हा आहे. म्हणून आगामी निवडणुका लक्षात ठेवून राष्ट्रवादीच्या जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी स्वतःसाठी काम न करता पक्षासाठी काम करुन पक्ष वाढीसाठी मेहनत घेतल्यास राज्यात, जिल्ह्यात, नगर परिषदेत काम करण्याची संधी चंद्रपूर जिल्ह्याला दिली जाईल यात ५० % महिलांचा सुद्धा विचार केला जाईल असेही बोलले. आणि धानाला योग्य भाव देण्यासाठी मी स्वतः राज्याचे मुख्यमंत्री, अर्थमंत्री, कृषिमंत्री यांचेशी प्रत्यक्ष चर्चा करून शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे शरद पवार म्हणाले.
चंद्रपूर जिल्हा राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीच्या कार्यकर्ता, शेतकरी, कामगार, मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी माजी केंद्रीय मंत्री श्री. प्रफुल पटेल यांनी सर्व सामान्य जनतेच्या समस्या जाणणारा जाणता राजा पवार साहेब तुमच्या पाठीमागे खांभिरपणे उभे आहेत. करिता ज्यांच्यावर पक्षाची जबाबदारी सोपविली आहे त्यांनी आपली जबाबदारी पार पाडावी. पक्ष मजबूत करण्यासाठी झटल्यास त्यांना नक्कीच संधी मिळते असे अध्यक्षीय मत व्यक्त केले. तर चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्याचे संपर्क मंत्री, आदिवासी विकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दोन्ही जिल्ह्यातील पक्षाची स्थिती, आदिवासी समाजाची स्थिती लक्षात आणून देताच जिल्ह्यात कोविडचे लसीकरण देखील चुकीचे झाले असल्याचे आपल्या भाषणांमधून सांगितले. जाहीर सभेचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य यांनी केले. जिल्हा महिला अध्यक्ष बेबीताई उईके यानीही मनोगत व्यक्त केल्या. संचालन प्रमोद मोहोड यांनी केले. मंचावर माजी खासदार मनोहर कुकडे, माजी मंत्री सुबोध मोहिते, चंद्रिकापुरे, आमदार कारेमोरे, माजी आमदार जैन, रमेशबंग, प्रकाश गजभिये, यांचेसह राष्ट्रवादीचे नेते प्राचार्य अशोक जीवतोडे, ऍड. बाबासाहेब वासाडे, शोभाताई पोटदुखे, ईश्वर बालबुद्धे, बल्लारपूर विधानसभा अध्यक्ष सुमित समर्थ, जिल्ह्यातील सर्व तालुका अध्यक्ष महिला अध्यक्षा, युवक कांग्रेस अध्यक्ष, यांचेसह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्यासंख्येने उपस्थित होते. तसेच शरद पवार साहेबांच्या विचारांना माननारी जनता बहुसंख्येने उपस्थित होती. कार्यक्रमाचे आभार नितीन भटारकर यांनी मानले.
0 comments:
Post a Comment