Ads

ऑटोरिक्षा चालकांचे घोषणा झालेल्या कल्याणकारी मंडळाची त्वरीत अंमलबजावणी सरकारने करावेत अन्यथा 'संयुक्त महासंघ राज्यव्यापी आदोलन करणार .

The government should immediately implement the welfare board announced for autorickshaw drivers, otherwise the United Federation will launch a statewide agitation.
चंद्रपूर :- ऑटोरिक्षा संघटना संयुक्त महासंघ, महाराष्ट्र राज्य या संयुक्त महासंघाचे कार्याध्यक्ष मा. श्री. चरणदास वानखेडे तथा राज्य प्रवक्ता मा. आनंद चवरे, महासचिव मच्छीन्द्र कांबळे, कोषाध्यक्ष महेश चौगुले यांच्या नेतृत्वखाली दि. 13/11/2021 रोजपासून विदर्भातील विविध जिल्ह्यात ऑटोरिक्षा संघटनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची संघटनात्मक बांधणी करीता "संयुक्त महासंघाच्या माध्यमातून बैळका घेण्यात आले. पहिल्या टप्यात नागपूर जिल्ह्यातील ऑटोरिक्षा संघटनेच्या वतीने स्वागत करण्यात आले. ज्येष्ठ कामगार नेते भाई मोहनदासजी नायडु यांचे शाल श्रीफळ देवून स्वागत करण्यात आले व त्यांचे आशीर्वाद घेण्यात आले. नागपूरातील विविध संघटनेच्या पदाधिकारी यांनी संयुक्त महससंघात संलग्णपत्र देण्यात आले.

दि. 17/11/2021 रोजी चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा, भद्रावती व चंद्रपूर शहरातील विविध संघटनेच्या पदाधिकारी यांची भेट घेण्यात आली. चंद्रपूर मधील अग्रणी संघटना महाराष्ट्र ऑटोरिक्षा चालक-मालक असोसिएशन व विदर्भ ऑटोरिक्षा चालक कामगार संघटना यांची संयुक्त संघटनात्मक बैठक न्यु इंग्लीश हायस्कुल ग्रांऊंड मध्ये संयुक्त महासंघाचे राज्य संघटक मा. राजेंद्र खांडेकर, मा. मोक्षवीर, लोहकरे यांच्या नेतृत्वाखाली चंद्रपूर येथे आयोजित करण्यात आले होते. संयुक्त महासंघासोबत आम्ही चंद्रपूर आणि विदर्भातील सर्व जिल्हे ताकदीने सोबत राहु अशी ग्वाही यावेळी त्यांनी दिली. संयुक्त महासंघाचे राज्य कार्याध्यक्ष मा. भाई चरणदास वानखेडे यांनी आपल्या संघटनात्मक बांध ाणी बाबत धोरण स्पष्ट केले. महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील ऑटोरिक्षा संघटनेच्या नेत्यांना सोबत घेवून त्यांच्यावर संयुक्त महासंघाची जबाबदारी सोपवण्यात येणार आहे. विविध जिल्ह्यातील ऑटोरिक्षा चालकांच्या भावनेसोबत सरकार वेळोवेळी खेळत आहे. ऑटोरिक्षा कल्याणकारी मंडळाच्या नुसत्या घोषणाबाजी केल्या जातात पण प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी केली जात नाही. प्रत्येक वेळी सरकार कारणे सांगुन वेळकाढुपना करतो. कधी तामीलनाडु सरकारच्या धर्तीवर म्हणतात तर कधी कोण्या धर्तीवर म्हणतात. ऑटोरिक्षा चालकांचे घोषणा झालेले कल्याणकारी मंडळ हे तामीलनाडु च्या धर्तीवर करा किंवा मंडळ

ग्रहांच्या धर्तीवर करा, कसही करा पण ऑटोरिक्षा चालकांचे कल्याणकारी मंडळाची त्वरीत अंमलबजावणी करा. जर

सरकारने या हिवाळी अधिवेशनात ऑटोरिक्षा चालकांच्या बहुचर्चीत कल्याणकारी मंडळाची अंमलबजावणी केली नाही

तर येणान्या थोड्याच दिवसात संयुक्त महासंघ राज्यव्यापी आंदोलन करणार, अध्यक्षीय भाषणात संयुक्त महासंघाचे

राज्य अध्यक्ष मा. श्री. मधुकर थोरात यांनी व्यक्त करतांना बोलत होते की, आपल्या प्रलंबित कल्याणकारी मंडळाची

त्वरीत अंमलबजावणी केली नाही तर सरकारच्या विरोधात तिव्र आंदोलन करू. त्यासाठी आपण प्रथमतः संघटीत होवू

मग संघर्ष निर्माण करू कारण सरकार संघटीत लोकांना घाबरते. असंघटीत लोकांना घाबरत नाही. अशा स्वरूपाने

आपन संघटीत होवून लढलो तर नक्कीच कल्याणकारी मंडळ ऑटोरिक्षा संघटना संयुक्त महासंघ खेचुन आनु शकते

असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला. या संघटनात्मक बांधणी बैठकीचे प्रास्ताविक श्री राजेंद्र खांडेकर यांनी तर संचालन मधुकर राऊत व आभार प्रदर्शन मा. मोक्षवीर लोहकरे यांनी मानले. यावेळी चंद्रपूर जिल्ह्यातील विविध विविध ऑटोरिक्षा संघटनेचे पदाधिकारी मा. पुरुषोत्तम खिल्लारे, श्री मुजफर खान, श्री सुनिल धंदरे, श्री कुंदन रायपुरे, श्री विनोद चन्ने, रवीं आंबटकर, रमेश वझे, किशोर वाटेकर, हरीदास नागापुरे, मोइनुद्दीन हुसेन, रमेश मुन, मोहन निदेकर, विलास बावणे, बाळु उपलंचीवार, अरविंद तिखट यांचेसह अनेक ऑटोचालक पदाधिकारी उपस्थित होते.


Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment