चंद्रपुर :- महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित सोमय्या पॉलीटेकनिक कॉलेज वडगाव येथे संविधान दिवस साजरा करण्यात आला, संस्थेचे संस्थापक श्री. पी. एस. आंबटकर, सचिव सौ. प्रीती पांडुरंगजी आंबटकर, उपाध्यक्ष श्री. पियुष आंबटकर, सौ. अंकिता पियुष आंबटकर, प्राचार्य श्री. जमीर शेख सर, रजिस्टर श्री बिसेन सर यांची उपस्थित होते.
"आपले संविधान आपला आत्मसन्मान"
संविधान दिवसाविषयी विद्यार्थ्यांना माहिती देत असताना २६ नोव्हेंबरला भारतीय संविधान स्वीकृत केले. त्यामुळे हा दिवस भारतीय संविधान म्हणून साजरा केला जातो. तसेच देशात समता, बंधुता, न्याय, स्वात्रेत ही मूल्य रुजली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भरीव योगदानातून घटना समितीने २६ नोव्हेंबर १९४९ रोजी समर्पित करून प्रजासत्ताक राष्ट्राची पायाभरणी केली. संविधानात्मक हक्का सोबत कर्तव्याची अमलबाजवणी महत्वाची आहे,
प्रत्येक नागरिकाला स्वतंत्र भारतात राहण्याचा समान अधिकार दिला आहे, जागरूकता व्हावी आणि संविधानिक मूल्याचा प्रचार व्हावा यासाठी संविधान दिवस साजरा केला जातो. या कार्यक्रमाला सर्व विभाग प्रमुख आणि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते
0 comments:
Post a Comment