Ads

राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे संविधान दिन साजरा


राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे जिल्हाध्यक्ष नितीन कुकडे, विजय मालेकर, डॉ. अशोक जिवतोडे व इतर मान्यवर
चंद्रपुर :- संविधान दिनाचे औचित्य साधुन दि. २६ नोव्हेंबर २०२१ ला जनता महाविद्यालय, चंद्रपूर येथे संपन्न झाला. या प्रसंगी संविधानांच्या उदेशिकेचे वाचन करण्यात आले. ओबीसी महासंघाचे जिल्हाध्यक्ष श्री. नितीन कुकडे यानी संविधानदिनी असे म्हटले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकराच्या संविधानामुळे या देशातील सर्व नागरिकांना सामाजीक, आर्थिक, राजकीय, न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रध्दा व उपसना यांचे स्वातंत्र, दर्जाची व संधिची समानता दिली गेली आहे. तसेच व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता व एकात्मता टिकविण्यासाठी बंधुता हा फार मोठा विचार डॉ. बाबासाहेब यानी मांडलेला आहे. त्यामुळेच आपला देश प्रगतीपथावर आहे.Constitution Day celebrated by National OBC Federation

याप्रसंगी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय समन्वयक डॉ. अशोक जिवतोडे, जिल्हा सचिव विजय मालेकर, यानी संविधानाविषयी मनोगत व्यक्त केले तसेच डॉ. चटप, शरद कुत्तरमारे, रवि जोगी, प्रशांत चहारे, संजय वाघमारे, संजय रगारी, किशोर धनविजय पाटिल, शितल पाटील, शारदा नवघरे, मंजुषा डुडुरे, ज्योत्सना लालसरे, गेडाम, चामाटे, मोडक, पिंपळकर, थेटे, वासेकर, खोके, गाडगे, राहुल देशमुख, मनिष यादव, सोनी, अमित अत्तरकर, सुनिल मुसळे व इतर अनेक मान्यवर उपस्थीत होते.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment