चंद्रपुर :- स्थानिक हिंग्लाज भवानी वार्ड क्र. 17 जुनोना रोड, बाबुपेठ, येथे दि.:-30/10/2021 ला पोलीस कर्मचारी बाबुराव कुसळे यांने महिलांना केलेल्या मारहाण प्रकरणात पाच (5) महिलांना जख्मी झाल्या असून त्यातील एक (1) महिला नामे सौ. तडसे यांचा हात फ्रैक्चर असून डोक्याला जबर मार असून ती सरकारी दवाखान्यात भरती आहे.
या प्रकरणाची तक्रार रामनगर पोलीस स्टेशन येथे लेखी स्वरुपात दिली असतांनाही पोलिस विभागाकडून कोणतीही कार्यवाही झाली नसून उलट रामनगर पोलीस स्टेशनचे कर्मचारी हे तक्रार कर्त्यावर दबाव टाकत असून दोन (2) दिवस लोटले तरी अजुन साधी चौकशी सुद्धा केलेली नसून महिलांचे मेडिकलही करण्यात आले नाही.
रामनगर पोलीस ठाणेचे संबंधीत पोलीस कर्मचारी एक प्रकारे या गुंडप्रवृत्तिच्या पोलिस कर्मचाऱ्याला पाठीशी घालत आहे. या संबंधीची तक्रार पोलीस अधीक्षक यांना सुद्धा दिली आहे. दि. 30/10/21 ला या जिल्हाचे पालकमंत्री महोदयांची पत्रकार परिषदेत पोलीस प्रशासनाचे गुन्हाचे प्रमाण कमी असल्याबद्दल कौतुक करीत असतांना त्याच दिवशी पोलीस कर्मचाऱ्या कडुन महिलांना मारहाण करण्यात येते.
पोलीस हे जनतेचे मित्र-रक्षक असतांना असे गुंड प्रवृत्तिच्या पोलीस कर्मचाऱ्याबद्दल पालकमंत्री महोदयांनी काय म्हणावे हे तपशील द्यावे.
पोलीस कर्मचार्यावर कार्यवाही करून त्याला बेड्या ठोकण्यात याव्या आणि आम्हाला न्याय न मीळाल्यास आंदोलन व उपोषण केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही.
बाबुराव कुसळे हा अल्का बागडे हिचा ठेवलेला नवरा म्हणुन येथे राहत असल्याने हा येथे आल्यापासून शेजाऱ्याशी नेहमी भांडन करून तणाव निर्माण करून लोकांच्या जागेवर जबरदस्ती बांधकाम करीत आला आहे.
तीन (3) फुटाची ये-जा करणारी गल्लीतही नवीन बांधकाम करून रस्ता बंद केला या संबंधी म.न.पा.ला तक्रारही दिली असतांना बांधकाम न करण्याचे सांगुनही प्रकरणाच्या दिवशी स्लैब टाकन्याचे काम सुरु होते.
बाबूराव कुसळे या मुजोर, हेकेखोर, गुडप्रवृत्तीच्या पोलीस कर्मचार्याला पोलिस विभागाकडून कड़क कार्यवाही करून त्याला अटक करण्यात यावी व केलेले बांधकाम त्वरित पाडण्यात यावे, मागणी पीडित महिलांनी पत्रपरिषदेत केली आहे.Demand for action in the case of beating of women by police officer Baburao Kusale
0 comments:
Post a Comment