चंद्रपुर :-महिला बचट गटांच्या माध्यमातून महिलांना स्वयंरोजगाराची उत्तम संधी प्राप्त झाली आहे. अनेक बचट गट गृहउद्योगाच्या माध्यमातून रोजगार निर्मितीत मोठे योगदान देत आहे. दिवाळी फराळ तयार करुन ते विक्री करण्याचा त्यांचा हा उपक्रम कौतुकास्पद असून त्यांच्यातील पाककला कौशल्याचे प्रदर्शन करण्यासाठी योग्य व्यासपीठ मिळण्याचीही गरज आहे. बचत गटातील महिलांचा हा स्वयंचलीत गृहउद्योग म्हणजे रोजगार निर्मितीकडील यशस्वी पाऊल आहे. असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.
उमेदच्या वतीने तहसील कार्यालयातील आवारात आयोजित दिवाळी फराळ साहित्य प्रदर्शन व विक्री प्रदर्शनीचे उद्घाटन आ. किशोर जोरगेवार यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी गटविकास अधिकारी आशुतोष सपकाळ, ता. या. व्य. शितल देरकर, यंग चांदा ब्रिगेड चे संघटक पंकज गुप्ता, करण बैस, राशीद हुसेन, कल्पना शिंदे आदींची उपस्थिती होती.
यावेळी पूढे बोलतांना आ. जोरगेवार म्हणाले कि, बचतगट हा एक सामाजिक-आर्थिक उपक्रम आहे. ही प्रक्रिया संघटितपणे एकमेकांना समजून घेत होत असल्याने या रचनेला स्वयंसहाय्य करणारी आहे. घरातील जबादा-यांसह महिला आता आपल्यातील कौशल्य दाखविण्याची संधी सुध्दा महिला बचतगटांच्या माध्यमातून सिध्द करत आहेत. नोकरी न करताही कुटुंबाला आर्थिक धैर्य देण्यात आज महिला बचत गटातील सदस्यांचा वाटा महत्वाचा आहे. महिला बचत गटाच्या माध्यमातून अनेक नवे लघूउद्योग पुनर्जीवित झाले आहे. या उद्योगात मोठ्या प्रमाणात रोजगारही उपलब्ध होत आहे. चंद्रपूर जिल्हातही बचतगट झपाट्याने वाढत आहेत. विशेषतः ग्रामीण भागात बचत गटांचे कार्य उत्तम सुरु आहे. याचा ग्रामिण अर्थव्यवस्था आणि समाज यावर चांगला परिणाम होत आहे. बचतगटाच्या मदतीने बऱ्याच महिला उपलब्ध स्थानिक स्त्रोतांसह त्यांचे कौशल्य आणि ज्ञानाने स्वयंरोजगार निर्माण करून स्वावलंबी झालेल्या आहेत. त्यामूळे महिला बचत गटांना सक्षम करण्याची भुमिका महाविकास आघाडी सरकारची असून त्यांना योग्य व्यासपीठ मिळवून देण्याचे काम सरकारच्या वतीने केल्या जात आहे. दिवाळी निमित्य महिला बचत गटांनी या प्रदर्शनीसाठी तयार केलेले साहित्य व फराळ त्यांच्यातील कौशल्याची साक्ष देणारा असल्याचे ते यावेळी म्हणाले. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी विक्री प्रदर्शनीची पाहणी करत महिलांनी तयार केलेल्या साहित्यांची माहिती जाणून घेतली. तसेच सदर साहित्य खरेदी केले. यावेळी महिला बचट गटांच्या महिलांचीही मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रतीक्षा खोब्रागडे, जयश्री नागदेवते, सिद्धर्थ ढोणे, आशिष चवरे, प्रवीण फुके, रमेश खोब्रागडे, मयूर भोपे, सलमा शेख, सोनम जांभुलकर आदींनी परिश्रम घेतले. याप्रसंगी महिलांनी विविध वस्तूंची मोठ्या प्रमाणात विक्री केली.
0 comments:
Post a Comment