Ads

खाकी वर्दीतला शिपाई करतोय गाणी गाऊन लोकांचे मनोरंजन !

Police Constable Entertain people by singing songs in khaki uniform!

भद्रावती तालुका प्रतिनिधी :-
आपल्या सुरेल गायनाने भद्रावतीकरांना भुरळ पाडून त्यांचे मनोरंजन करण्याचे कार्य येथील खाकी वर्दीतल्या एका कर्मचाऱ्याने सुरु केले असून समाज माध्यमावर त्याची प्रशंसा केली जात आहे.
हा खाकी वर्दीतील कर्मचारी दुसरा-तिसरा कोणी नसून येथील नगर परिषदेचा चतुर्थ श्रेणी कर्मचारी बंडू चिंधुजी कन्नाके हा आहे. ४५ वर्षीय बंडू कन्नाके हे सध्या नगर पालिकेत पंप चालक या पदावर कार्यरत असून भद्रावतीकरांना पाणी पुरवठा करतात. ते आपले कर्तव्य बजावत असतांनाच एक छंद म्हणून गाण्याची मैफिल रंगवितात.
ते भद्रावती शहरातील खापरी सुमठाना येथील रहिवासी आहेत. त्यांचे वडील चांदा आयुध निर्माणीत नोकरीवर होते. बारावी पर्यंत शिक्षण घेतल्या नंतर १९९६ मध्ये ग्रामपंचायत भद्रावती येथे ते सफाई कामगार म्हणून काम करू लागले. सन १९९७ मध्ये या ग्राम पंचायतीचे रूपांतर नगर परिषदेमध्ये झाले. त्यामुळे ते नगर परिषदेमध्ये सफाई कर्मचारी म्हणून काम करू लागले. सध्या ते नगर परिषदेत पंप चालक म्हणून काम करीत आहेत. त्यांना शालेय जिवनापासुनच गायनाची आवड होती. त्यामुळे ते कोणत्याही छोट्या मोठ्या कार्यक्रमात सहभागी व्हायचे. आताही ते विविध प्रकारची गाणी सुरेल आवाजात गातात. त्यांच्या या गायणाच्या कलेमुळे नागरिक त्यांला जवळ बोलावतात व गायनाची विनंती करतात. रोज ते आपल्या घरी आपल्या कुटुंबाच्या मनोरंजनासाठी गाणी गातात. त्यांची गाणी ऐकल्या शिवाय त्यांच्या कुटुंबातील सदस्य जेवन सुध्दा करीत नाही. आता पर्यंत त्यांची अनेक गाणी फेसबूक वर आलेली आहेत. चंद्रपुर येथील सुगम संगीताच्या कार्यक्रमात गाणे गाण्याकरीता त्यांना बोलाविण्यात येते. सवड मिळाली तर ते कार्यक्रमात हजेरी लावतात. पहीले आपली नोकरी नंतर इतर कामे असे त्यांचे तत्व आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment