Ads

खाकी वर्दीतील देव माणूस शोधत ‘तो’ पोहोचला बल्लारपूर पोलिस ठाण्यात


God in khaki uniform looking for man He reached Ballarpur police station
बल्लारपूर (प्रतिनिधी):-

बल्लारपूर तालुक्यातील विसापूर निवासी नामदेव शेडमाके कोर्टाच्या कामाकरिता 19 नोव्हेंबरला राजुरा जाण्यासाठी निघाले. मात्र गुरुनानक कॉलेज जवळ वाटेत एक श्वान आडवे आल्याने त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात शेडमाके यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले व वाहन दुभाजकावर आदळले. या अपघातातनंतर शेडमाके हे बेशुद्धावस्थेत पडून होते. काही वेळानी शेडमाके शुद्धीवर आले. त्यावेळी ते बल्लारपूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत होते. त्यांच्या डोळ्याला गंभीर दुःखापात झाली.
शेडमाके यांनी आजूबाजूला बघितले त्यांना 2 वाहतूक पोलिस कर्मचारी दिसले. त्या दोघांनी दुचाकीची चाबी व सोबत असलेले कागदपत्र देत घरच्यांना निरोप द्या..असे सांगून निघून गेले. घरच्यांना निरोप मिळताच कुटुंबातील व्यक्ती रुग्णालयात आले व नामदेव शेडमाके यांना घरी घेऊन गेले. रात्री जेव्हा शेडमाके यांना झालेला अपघाताचा घटनाक्रम आठवला व अपघातातनंतर ते रुग्णालयात कसे आले. याचा विचार त्यांच्या मनात आला. दुसऱ्या दिवशी शेडमाके बल्लारपूर रुग्णालयात पोहचले व त्यांनी याबाबत विचारणा केली असता कुणीतरी वाहतूक शिपाई मंगेशने आपल्याला इथे दाखल केले असल्याचे सांगितले.
लगेच शेडमाके हे बल्लारपूर पोलिस ठाण्यात दाखल झाले. मात्र वाहतूक पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये कुणीही मंगेश नामक कर्मचारी नव्हता, अशी माहिती मिळाल्यावर शेडमाके थोडे खचले. मात्र काही वेळात पुन्हा एका कर्मचाऱ्याला त्यांनी याबाबत विचारणा केली. मात्र ज्या वाहतूक कर्मचाऱ्याला त्यांनी विचारले तो कर्मचारीच खाकीतील देव माणूस होता. त्याचे नाव मंगेश नसून निलेश माळवे होते.
शेडमाके यांनी 19 नोव्हेंबरला घडलेल्या माणुसकीच्या कार्याबद्दल वाहतूक पोलिस कर्मचारी निलेश माळवे यांच्याशी हस्तांदोलन करीत त्यांचे मनापासून आभार मानून उपस्थित पोलिस कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.
फोटो-21 chd 13
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment