Ads

दिव्यांगांना जलद प्रमाणपत्र मिळण्याच्या मार्ग सुकर

चंद्रपूर : समाजात दिव्यांगांची संख्या मोठी आहे. त्यांना शासनाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी दिव्यांग प्रमाणपत्राची गरज असते. परंतु शासकीय रुग्णालयात आठवड्यातून एक दिवस हे प्रमाणपत्र देत असल्याने दिव्यांगांची मोठी गैरसोय होत आहे. परिणामी दिव्यांगांना विविध योजनांपासून वंचित राहावे लागते. हि बाब खासदार बाळू धानोकर यांच्या निदर्शनास येताच त्यांनी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे पत्राचार करून प्रमाणपत्रासाठी विशेष मोहीम राबविण्याची लोकहितकारी मागणी केली होती. या मागणीची दखल घेत आरोग्य मंत्री टोपे यांनी विशेष मोहीम राबविण्याचे मान्य केले.


दिव्यांगासाठी विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी दिव्यांग प्रमाणपत्र अनिवार्य आहे. हे प्रमाणपत्र घेण्यासाठी जिल्हा भरातून दिव्यांग बांधव जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयात येतात. मात्र अनेकदा तांत्रिक अडचणी किंवा जिल्हा शल्य चिकित्सक उपस्थित नसतात. त्यामुळे प्रमाणपत्र न घेताच दिव्यांग बांधवाला आल्या पावली परत जावे लागते. त्यामुळे मानसिक त्रास सहन करण्यासह आर्थिक भुदंडही सहन करावा लागतो. काही दिव्यांग बांधवानी खासदार धानोकर यांची भेट घेत दिव्यांग प्रमाणपत्र देण्याचे दिवस वाढविण्याची मागणी केली होती. खासदार धानोरकर यांनी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना पत्र पाठवून दिव्यांगांच्या मागणीकडे लक्ष वेधले होते. टोपे यांनी या मागणीची दखल घेत १२ डिसेंबर २०२१ ते १२ मार्च २०२२ या कालावधीत जलदगतीने प्रमाणपत्र देण्याची मोहीम राबविणार असल्याचे मान्य केले आहे. तसेच आठवड्यातून तीन दिवस तपासणी केली जाणार आहे.

या निर्णयामुळे दिव्यांग बांधवांची प्रमाणपत्रासाठी होणारी होरपळ दूर होणार आहे. त्यामुळे होणाऱ्या मानसिक आणि आर्थिक त्रासापासून दिव्यांग बांधवांची सुटका होणार आहे. दिव्यांग बांधवांच्या मागण्यांची खासदार बाळू धानोकर यांनी दखल घेतल्याने दिव्यांग बांधवानी त्यांचे आभार मानले आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment