वरोरा प्रतिनिधी:-वरोरा शहरातील मार्डारोड लगत नवीन ले आऊटच्या बांधकामासाठी भटाळा येथील एका ठेकेदाराला मुरुम टाकण्याचे काम देण्यात आले. या कामासाठी ठेकेदाराला वरोराचे तहसीलदार यांनी पांढ-या बोल्डरची परवानगी दिली. परंतु, ठेकेदार सदर जागेवर मुरुमाचे खोदकाम करीत होता. याची माहिती मिळताच तलाठी विनोद खोब्रागडे यांनी मौक्यावर पोहोचून अवैधरित्या मुरुमाचे उत्खनन व वाहतूक केल्याच्या आरोपात कारवाई करत 1,15,60,000 रुपयांचा माल जप्त केला. शिवाय 10 लाखाचा दंड ठोठावला आहे. या कारवाईने जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध उत्खनन करणा-यांमध्ये खळबळ उडाली आहे. ही कारवाई 19 नोव्हेंबरला करण्यात आली.
वरोरा शहरातील मार्डारोड लगत एका ले आऊटचे बांधकाम सुरू आहे. यासाठी ठेकेदार शंकर धोत्रे यांना मुरुम पुरवठा करण्याचा ठेका देण्यात आला. सदर ठेकेदाराला तहसीलदारांमार्फे पांढ-या बोल्डरची परवानगी देण्यात आली. परंतु, त्यानं बोल्डरच्या जागी मुरुमाचे उत्खनन केले. याबाबतची माहिती वरोराचे तलाठी विनोद खोब्रागडे यांना मिळताच त्यांनी मौक्यावर पोहोचून तीन ट्रक चालकांना पनवानगीचे कागदपत्र मागितले. यावेळी चालकांनी पांढ-या बोल्डरच्या परवानगीची टीपी दाखविली. दरम्यान तलाठीने वाहन क्रं. एमएच 34 एफबी 7439, एमएच 31 एम 3472 व एमएच 36-1672 विरुद्ध कारवाई करत वाहनांना तहसील कार्यालयात पाठविण्यास सांगितले. मात्र, चालक वाहनांना तहसील कार्यालयात घेवून जाण्याऐवजी ट्रकसह फरार झाले. त्यामुळे तलाठीने वाहन मालक खेमजई निवासी शंकर धोत्रे, भटाळा निवासी रंजन कांबळे व चालक विलास वाकडे, सुरज भगत यांच्याविरुद्ध चोरीची तक्रार ठाण्यात नोंदविली. दरम्यान तलाठीने 1,15,60,000 रुपये किंमतीचा मुरुम जप्त केला आहे. तसेच ट्रक घेवून फरार झालेल्या तिनही ट्रक मुरुम असा एकूण 10 लाख रुपये चोरी ची तक्रार दिली. या आधारावर वरोरा पोलिसांनी आरोपींवर गुन्हा दाखल केाल आहे. प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार दीपक खोब्रागडे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.
0 comments:
Post a Comment