ऊर्जानगर(चंद्रपूर):-वंदनिय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांचे गुरू परमहंस सदगुरु श्री आडकूजी महाराज यांची द्विशताब्दी जयंती व शताब्दी पुण्यतिथी श्री गुरुदेव सेवा मंडळ ऊर्जानगर द्वारा कार्यालयात सायंकाळी सामुदायिक प्रार्थनेनंतर प्रतिमेला व अधीष्ठानाला माल्यार्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले यावेळी आडकूजी महाराजांच्या जीवनावर व कार्यावर मंडळाचे अध्यक्ष मुरलीधर गोहणे यांनी माहिती दिली.या कार्यक्रमाला श्रीगुरुदेव सेवा मंडळ ऊर्जानगरचे सेवाधिकारी शंकर दरेकर,अध्यक्ष मुरलीधर गोहणे,सचिव विलास उगे, कोषाध्यक्ष देवराव कोंडेकर,प्रसिद्धीप्रमुख खेमदेव कन्नमवार,मारोती पिदूरकर,भास्कर जोगी,धांडे बावाजी,कुलमेथे बावाजी,राजीराम भजनकर, विठ्ठल ननावरे तसेच महिला मंडळाच्या सचिव सविता हेडावू, योगिता कोंडेकर,स्मिता उईके,कमल पिदूरकर,ऋतुजा कोंडेकर,कीर्ती जोगी तसेच बालगोपाल यांची उपस्थिती होती.
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
0 comments:
Post a Comment