ऊर्जानगर(चंद्रपूर):-चंद्रपूर महाऔष्णिक विज केंद्राच्या ऊर्जानगर वसाहतीतील श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या सभासदांचा सामुहिक अभिष्टचिंतन सोहळा नुकताच संपन्न झाला.
सायंकाळी सामुदायिक प्रार्थनेनंतर सभासदांचा वैयक्तिक वाढदिवस साजरा न करता सामुहिक अभिष्टचिंतन सोहळा आयोजित करून वाढदिवस साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा सदाशिव आघाव , प्रमुख पाहुणे मंडळाचे अध्यक्ष मुरलीधर गोहणे,ज्योत्स्ना लांडे तसेच सत्कारमूर्ती अशोक धमाने, शंकर दरेकर ,मारोती साव, देवराव कोंडेकर,राजेंद्र पोईनकर, दिवाकर हेडावू,राजेंद्र लांडे,हरीचंद्र देवतळे,अशोक खाडे,संतोष चहानकर, रामदास तुमसरे,छत्रपती श्रीखंडकर,जयंत देठे,यांची उपस्थिती होती.
सभासदांमध्ये सामुदायिक तत्व जोपासल्या जावे,
सामुदायिक उपक्रम करता यावे याकरिता हा छोटासा प्रयत्न असून मान्यवराच्या हस्ते भेटवस्तू, ग्रामस्वराज्य दिनदर्शिका, दैनंदिनी देऊन सभासद सत्कारमूर्तिचे स्वागत व सत्कार करण्यात आला.यावेळी कर्मयोगी तुकारामदादा गीताचार्य विचार प्रतिष्ठान नागपूर द्वारा निर्मित ग्रामस्वराज्य दिनदर्शिका आणि दैनंदिनी २०२२ चे प्रकाशन
मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन खेमदेव कन्नमवार यांनी केले तर आभार मधुकर दुफारे यांनी मानले कार्यक्रम यशस्वीत्याकरिता गुरुदेव सेवा मंडळाच्या पदाधिकारी व सदस्यांनी अथक परिश्रम केले व शेवटी राष्ट्रवंदनेने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
0 comments:
Post a Comment