घुग्घुस प्रतिनिधी :- मागील काही दिवसांपासून घुग्घूस शहरामध्ये येणाऱ्या मुख्य मार्गावर खूप मोठ्या प्रमाणामध्ये खड्डे पडलेले आहेत परंतु प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष आहे आम आदमी पार्टी घुग्घूस द्वारा मागील तीन महिन्यांपासून वारंवार निवेदन देऊन सुद्धा खड्डे अजूनपर्यंत बुजविण्यात आलेले नाही. घुग्घूस शहरातील नागरिकांना या खड्ड्यांमुळे जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये येण्याचा हा मुख्य मार्ग असल्यामुळे नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे हॉस्पिटल मध्ये येणाऱ्या रुग्णवाहिके मध्ये येणाऱ्या गरोदर मातांना मोठे गचके बसतात यामुळे त्यांच्या जीवाची हानी होण्याची शक्यता दाट वाढलेली आहे. परंतु प्रशासनाला जाग आली नसल्यामुळे आम आदमी पार्टी घुग्घूस द्वारा IVRCL चंद्रपूर टोल नाका, ए सी सी चांदा सिमेंट वर्क्स आणि नगरपरिषद घुग्घूस इथे निवेदन देण्यात आले. सात दिवसांमध्ये रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली नाही तर आम आदमी पार्टी घुग्घूस द्वारा आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.
यावेळी उपस्थित शहर अध्यक्ष अमित बोरकर, उपाध्यक्ष अभिषेक सपडी, सचिव संदीप पथाडे, विकास खाडे, आशिष पाझारे, रवी शांतलावार, प्रशांत सेनानी, सागर बिऱ्हाडे, दिनेश पिंपलकर, निखिल कामतवार , सारंग पिदुरकर, सोनू शेट्टियार, स्वप्नील आवळे, अभिषेक तालापेल्ली इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.
0 comments:
Post a Comment