चंद्रपुर :- केंद्र सरकारच्या माध्यमातून स्वच्छतेमध्ये शहराचा दर्जा सुधारण्याकरीता संपूर्ण देशातील शहराचे लोकसंख्येच्या प्रमाणात वर्गीकरण करण्यांत येवून, त्यामध्ये शहराधी स्पर्धा निर्माण करण्यांत आली. या स्पर्धेमध्ये सहभागी शहराचे दरवर्षी केंद्र सरकारच्या टिमव्दारे सर्वेक्षण होते. यावर्षी सुध्दा स्पर्धेमध्ये भाग घेतलेल्या नगर पंचायत, नगर परिषद व महानगरपालिका यांचे केंद्र सरकारच्या टिमव्दारे सर्वेक्षण करण्यात आले. या स्पर्धेमध्ये चंद्रपूर जिल्हा हा देशातून दुसऱ्या क्रमांकावर आहे.
या स्पर्धेचा दिनांक २० नोव्हेंबर, २०२१ रोजी विज्ञान भवन, नव्वी दिल्ली येथे पुरस्कार सोहळा स्वच्छ अमृत महोत्सव आयोजीत करण्यांत आला होता. या पुरस्कारात संपूर्ण देशात पुणे जिल्हयातील ८ शहर, नागपूर जिल्हयातील ८ शहर व चंद्रपूर जिल्हयातील ७ शहरांना पुरस्कार देण्यांत येवून गौरविण्यांत आले. पुणे व नागपूर या दोन जिल्हयातील शहरांनी प्रत्येकी ८ शहरांना पुरस्कार प्राप्त झाल्याने हे जिल्हे पहिल्या क्रमांकावर तर चंद्रपूर जिल्हातील ७ शहरांना पुरस्कार प्राप्त झाल्यामुळे हा जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर आहे.
चंद्रपूर जिल्हयातील ७ शहरामध्ये भद्रावती नगर परिषद बेस्ट सिटी इन इनोवेशन अॅण्ड बेस्ट प्रॉक्टीसेस मुल नगर परिषदेला बेस्ट सिटी इन सिटीजन, फिडबॅक अॅण्ड थ्री स्टार, चंद्रपूर महानगरपालिकेला थ्री स्टार बल्लारपूर नगरपरिषदेला थ्री स्टार ब्रम्हपुरी नगरपरिषदेला थ्री स्टार, सावली नगर पंचायती ला थ्री स्टार, व कोरपना नगरपंचायतीला थ्री स्टार पुरस्कार देण्यांत येवून गौरविण्यांत आले.
चंद्रपूर जिल्हयातील सर्व नगर परिषद, नगर पंचायत व महानगरपालिका यांचा स्वच्छ सर्वेक्षण २०२१ बाबत मा. अजय गुल्हाने, जिल्हाधिकारी, चंद्रपूर यांनी वेळोवेळी आढावा घेवून, सर्व शहराच्या अधिकाऱ्यांना योग्य मार्गदर्शन केले. त्यामुळे सर्व पुरस्कार प्राप्त शहराच्या अधिकाऱ्यांनी मा. अजय गुल्हाने, जिल्हाधिकारी, चंद्रपूर यांचे पुष्पगुच्छ देवून आभार मानले. यावेळी भद्रावती, मुल, चंद्रपूर, बल्लारपूर, ब्रम्हपुरी, सावली व कोरपना या पुरस्कार प्राप्त शहराचे अधिकारी तसेच इतर शहराचे अधिकारी उपस्थित होते.
मा. जिल्हाधिकारी, चंद्रपूर यांनी सर्व शहरातील अधिकाऱ्यांना सूचना केल्या की, यापुढे स्वच्छ सर्वेक्षणामध्ये जास्तीत जास्त शहरांनी सहभाग दर्शवावा आणि असेच संपूर्ण चंद्रपूर जिल्हा स्वच्छतेमध्ये अग्रेसर ठेवावा. या स्वच्छ सर्वेक्षणाकरीता शासनाकडून प्राप्त होणाऱ्या टुल किट व स्वच्छ सर्वेक्षणाचे मार्गदर्शक तत्वे यांचा योग्य पध्दतीने अभ्यास करवा. या टुल किट मध्ये दर्शविण्यांत आलेल्या गुणा नुसार जास्तीत जास्त गुण मिळविण्याचा सर्व शहरांनी प्रयत्न करावा. याकरीता लागणारी आवश्यक ती मदत जिल्हा कार्यालयाकडून पुरविण्यात येईल. असे कळविले.
0 comments:
Post a Comment