चंद्रपूर : प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजनेच्या प्रारंभा पासून नोव्हेंबर २०२१ पर्यंत लाभार्थ्यांची संख्या व या अंतर्गत राज्यनिहाय व मासिक अहवालाची विचारणा तसेच यामध्ये किती व्यवहार अयशस्वी झालेत व त्यांची कारणे कोणती या खासदार बाळू धानोरकर यांनी लोकसभेत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेत तब्बल ६९ लाख प्रकरणे अयशस्वी झाल्याची माहिती दिली.
प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेत दर चार महिन्यांनी २००० रु याप्रमाणे तीन हप्त्यांमध्ये लाभार्थ्यांना मदत केली जाते. १ फेब्रूवारी २०१९ पासून ३१ ऑक्टोबर २०२१ पर्यंत या योजनेअंतर्गत केंद्र सरकारने हे व्यवहार अयशस्वी होण्यामागची विभिन्न करणे शोधून शेतकरी कुटुंबाना लाभ देण्यासाठी पुन्हा प्रोसेस मध्ये टाकण्यात आल्याचेही कृषी मंत्र्यांनी सांगितले. यापैकी एकट्या महाराष्ट्रात अकरा लाख अठ्यान्नव हजार पाचशे त्रेचाळीस प्रकरणे अयशस्वी झाल्याची माहिती दिली आहे.
प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजनेअंतर्गत तब्बल ६९ लाख प्रकरणे प्रलंबित असून ते मार्गी लावण्यासाठी विविध उपायोजना करत असल्याची माहिती कृषी मंत्र्यांनी दिली आहे. परंतु आकडेवारीवरून हि योजना प्रत्यक्षात शेतकऱ्यांपर्यंत राबविण्यात केंद्र सरकार उदासीन असल्याचे खासदार बाळू धानोरकर यांनी म्हंटले आहे.
--
0 comments:
Post a Comment