Ads

भद्रावतीत हस्त शिल्प कारागीर करीता मार्गदर्शन शिबीर संपन्न

Guidance camp for handicraftsmen in Bhadravati

भद्रावती. तालुका प्रतिनिधी :-
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी कार्यालय ,विकास आयुक्त हस्तशिल्प वस्त्र मंत्रालय भारत सरकार, हस्तशिल्प सेवा केंद्र नागपूर व भारत शिक्षण संस्था भद्रावती यांच्या संयुक्त विद्यमाने , श्री साई आय. टी.आय. जैन मंदिर रोड, भद्रावती येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक भारत शिक्षण संस्था चे अध्यक्ष श्री किशोर पत्तीवार यांनी केले तसेच या विभागाच्या योजनेबद्दल तथा जेम पोर्टल, उड्डामित्ता विकास , रोजगार पोर्टल ,आर्तीजण कार्ड तसेच या डिपारमेंट बद्दल माहिती श्री सुरेश ताडेकर हस्तशिल्प संवर्धन अधिकारी यांनी दिली, या कार्यक्रमांमध्ये दक्षिणा हुमणे, मॅनेजर,समन्वयक सी. एम. आर. सी. ,माविम यांनी सुद्धा विविध विषयावर माहिती दिली. त्यानंतर शैलेंद्र मांडवे, मॅनेजर बँक ऑफ इंडिया, भद्रावती यांनी मुद्रा लोन , तसेच बँकेच्या विविध योजना बद्दल माहिती दिली. सौ करुणा पत्तीवार सचिव, भारत शिक्षण संस्था यांनी संस्थेबद्दल माहिती दिली. त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री अनिल धानोरकर यांनी सुद्धा बचत गट, हस्तशिल्प, यावर माहिती दिली॰ कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन राजराजेशवर इंग्लिश मीडियम स्कूल चे शिक्षिका सौ. किरण पाटील यांनी केले या कार्यक्रमामध्ये साडेचारशे ते पाचशे महिला तथा पुरुष व हस्तशिल्प कारागीर उपस्थित होते. साडे चारशे जणांचा या कार्यक्रमांमध्ये आर्तीजण फार्म भरण्यात आला. व त्या सर्वांना मोफत कार्ड देण्यात येईल. असे श्री सुरेश ताडेकर हस्तशिल्प संवर्धन अधिकारी यांनी कळविले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्कूल चे प्राचार्य रोषणा रामटेके यांनी केले तसेच या कार्यक्रमाचे व्यवस्थापन श्री साई आयटीआय ए.टी.एल. चे इन्चार्ज श्री कौतुभ गाडेकर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता श्री प्रमोद साखरकर, श्री राजेश नगराळे श्री अमर सातव, श्री विशाल जगताप, श्री ताराचंद उमरे, कु. रेणुका श्रीरामे, पूजा बोरकर, मंजुषा कापटे, ज्योत्स्ना झाडे, मनीषा बावणे, विकास बादखल, यांनी केले तसेच इतर हस्त शिल्प कारागिर जर असतील तर त्यांनी सुद्धा आर्तीजण फार्म भरून घ्यावे असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष श्री किशोर पत्तीवार यांनी केले.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment