भद्रावती (तालुका प्रतिनिधि ):- चंद्रपुर जिल्ह्यातील गौण खनिज चोरीला आढ घालण्याचे व कारवाई करण्याचे निर्देश जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी सर्व ठाणेदारांना दिले आहेत. पोलिस विभागाची गौण खनिज चोरांना वर करडी नजर आहेत.
दिनांक 02/12/2021 रोजी सकाळ सत्रामध्ये भद्रावती पोलीस ठाणेचे पोनि. गोपाळ भारती यांना पेट्रोलिंग दरम्यान गोपनिय बातमीदार यांच्याकडुन गोपनिय माहिती मिळाली की, भद्रावती टप्पा ते गांधी चौकी रस्त्याने 10 चाकी हायवा ट्रक मधुन अवैध चोरीची लाल मुरूम मातीची वाहतुक करण्यात येणार आहे. त्याप्रमाणे पोनि. गोपाळ भारती सो यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेउन ताबडतोब स्टाफसह रवाना झाले. परिसरामध्ये सदर वाहनाचा कसोशिने शोध घेतला असता 11:35 वाजण्याच्या सुमारास गांधी चौक येथे एक दहा चाकी हायवा ट्रक कमांक एम.एच 34 ए.बी. 7667 यामध्ये अवैधरीत्या लाल मुरूम माती भरून येत असतांना मिळुन आल्याने लागलीच दोन पंचाना घटनास्थळी बोलावुन सदर वाहन क एम.एच 34 ए. बी. 7667 चे चालकास त्याचे नाव पत्ता विचारले असता त्याने आपले नाव परशुराम किसन माथनकर, वय 28 वर्ष, धंदा चालक, रा. विजासन, नेताची चौक, भद्रावती असे सांगीतले. त्यास त्याचे मालकाबाबत विचारणा केली असता त्याने मालकाचे नाव सुभान सौदागर रा. भंगाराम वार्ड, भद्रावती असे सांगितले. सदर वाहनात काय आहे ? वैगरे बाबत वाहन चालकास विचारणा केली असता वाहन चालकाने गाडीमध्ये मानोरा शिवारामधुन सुभान सौदागर यांचे सांगणेवरून लाल मुरूम माती अवैदयरित्या चोरून आणल्याचे सांगीतले. त्यानंतर सदर वाहनाची पंचासमक्ष पाहणी केली असता सदर वाहनामध्ये अंदाचे 5 ब्रास लाल मुरूम माती असल्याचे दिसुन आले. सदर वाहन चालकाला मुरूम माती वाहतुकीचा टि.पी. परवाना, रॉयल्टी वा इतर कोणताही तत्सम परवाना आहे काय ? बाबत विचारणा केली असता त्याने कोणताही परवाना नसल्याचे सांगुन सदरची मुरूम माती ही मालक सुभान सौदागर यांचे सांगणेवरूनच अवैदयरित्या चोरून आणल्याचे सांगीतले. करता, अवैदय चोरीचा 01) 20,000/-रूपये किंमतीची अंदाजे 05 ब्रास लाल मुरूम माती, 02 ) 10,00,000/ रूपये किंमतीचा 10 चाकी हायवा ट्रक कमांक एम.एच 34 ए. बी. 7667 सफेद रंगाची कॅबीन असलेला हायड्रोलीक जॅक असलेला असा एकुण 10,20,000 /- रूपये किंमतीचा मुद्देमाल मिळुन आल्याने तो पंचासमक्ष जप्त करण्यात आलेला असुन नमुद आरोपी यांच्याविरूद्ध भद्रावती पोलीस ठाणे येथे अपराध कमांक 516/2021, भादंवि कलम 379, 109 प्रमाणे दाखल करण्यात आला असुन सदर गुन्हयामध्ये आरोपी नामे परशुराम किसन माथनकर, वय 28 वर्ष, धंदा चालक, रा. विजासन, नेताची चौक, भद्रावती यांस अटक करण्यात आले असुन पाहिजे आरोपी सुभान सौदागर, रा-भंगार वार्ड, भद्रावती यांचा शोध घेत आहे.
सदरची कामगिरी मा. पोलीस अधिक्षक श्री. अरविंद साळवे सो मा अपर पोलीस अधिक्षक श्री. अतुल कुलकर्णी सोो. मा. उपविभागिय पोलीस अधिकारी श्री. सुधिर नंदनवार यांच्या मार्गदर्शनाखाली भद्रावती पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक श्री. गोपाळ भारती सो. सहा. पोलीस निरीक्षक व्हि. डी. मुळे, पो.अं . 2496 विश्वनाथ चुदरी, पो.अं. 2445 जगदिश झाडे, पो.अं. 106 रोहित चिटगिरे, पो.अं. विजय उपरे यांनी केली.
0 comments:
Post a Comment