राजुरा (प्रतिनिधी) :-राजुरा तालुक्यात सुरू असलेल्या रेती तस्करीची गुप्त माहितीच्या आधारावर तहसीलदार हरीष गाडे व नायब तहसीलदार अतुल गांगुर्डे, विनोद डोनगावकर यांच्या पथकाने 2 डिसेंबरला रात्री छापा टाकून तालुक्यातील सोंडो गावाजवळ हायवा क्रं. एमएच 34 एव्ही 2353 वाहन विना परवानगी रेतीची वाहतूक करताना जप्त केले आहे. याप्रकरणी 2.44 लाखाचा दंड ठोठावण्यात आला आहे.
मागील काही दिवसांपासून गौण खनिज पथकाद्वारे होणा-या कारवाईची माहिती तहसील कार्यालयातून तस्करांना मिळाल्याने रेती तस्कर कारवाई पूर्वीच घटनास्थळावरून फरार होत होते. त्यामुळे तहसिलदारांनी स्वत:च्या नेतृत्वात नायब तहसीलदार यांच्यासह सोंडो गावाजवळ विना परवानगी चार ब्रास रेतीची वाहतूक करताना हायवा वाहनास रात्री पकडले. ट्रकची तपासणी केली असता विना परवानगी चार ब्रास रेती भरून घेवून जात होते.
चौकशीमध्ये ट्रक चालक ईश्वर भोयर याने सांगितले की, सदर हायवा वाहन जिवती निवासी राठोड यांचा आहे. या आधारावर तहसीलदारांनी हायवा ट्रकवर 2,44,400 रुपयाचा दंड ठोठावला आहे. या कारवाईमुळे रेती तस्करांमध्ये खळबळ उडाली आहे.
0 comments:
Post a Comment