बल्लारपूर (प्रतिनिधी) :-आज शनिवारी दुपारी चंद्रपूरकडून बल्लारपूरकडे येत असलेल्या पोलिस कर्मचारी एएसआयवर बिबट्याने जीवघेणा हल्ला केला. या घटनेत कर्मचारी गंभीररित्या जखमी झाला. त्यास उपचारासाठी चंद्रपूर जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे या मार्गावरून ये-जा करणा-या नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे.
प्राप्त माहितीनुसार जिल्हा पोलिस मुख्यालयात वायरलेस विभागात कार्यरत एएसआय अविनाश पडोळे हे आपल्या पॅशन मोटर सायकल क्रं. एमएच 34 एटी 2057 ने स्वार होऊन चंद्रपूरहून बल्लारपूरकडे निघाले होते. दरम्यान राज्य महामार्गावर जुन्या पॉवर हाऊसच्या टेकडीजवळ बल्लारपूर शहराच्या स्वागत गेट पार करताच झुडपामध्ये दबा धरून बसलेल्या एका बिबट्याने त्यांच्यावर हल्ला चढविला. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे पडोळे हे रस्त्यावर खाली पडले. त्यामुळे त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. हल्ला केल्यानंतर बिबट्या लगेच घटनास्थळावरून पळून गेला. घटनेनंतर मागून येत असलेल्या स्थानिक बीटीएस प्लांट निवासी राकेश यादव व दिपेश यादव यांनी तातडीने जखमी एएसआय यांना बल्लारपूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. परंतु, त्यांना गंभीर दुखापत झाली असल्याने अविनाश पडोळे यांची आरोग्य अधिकारी डॉ. गजानन मेश्राम यांनी प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात रेफर केले. येथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
0 comments:
Post a Comment