चंद्रपुर :-यंग चांदा ब्रिगेडची विभागनिहाय नविन कार्यकारणी घोषित करण्यात आली असून आज रविवारी कार्यालयात नवनियुक्त पदाधिका-यांचा पदग्रहण सोहळाही संपन्न झाला आहे. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी नवनियुक्त पदाधिका-र्यांना नियुक्तीपत्र देत शुभेच्छा दिल्यात.
आमदार किशोर जोरगेवार संस्थापक अध्यक्ष असलेल्या यंग चांदा ब्रिगेड या संघटनेच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात उल्लेखनिय काम केल्या जात आहे. त्यामूळे सामाजिक क्षेत्रात काम करण्याची आवड असलेला मोठा वर्ग या संघटनेशी जूळत आहे. दरम्याण आज यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यालयात विभागनिहाय नविन कार्यकारणी घोषित करण्यात आली असून सदर कार्यकारणीचा पदग्रहण सोहळा सपन्न झाला. यावेळी कलाकार मल्लारप यांची शहर युवक प्रमूख, राशेद हुसेन यांची अल्पसंख्यांक शहर युवक प्रमूख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच प्रतिक शिवणकर यांची शिक्षण आघाडी शहराध्यक्ष पदी, प्रभाकर धांडे यांची वेकोली विभाग शहराध्यक्षपदी, नकुल वासमवार यांची सोशल मिडीया प्रसिध्दी प्रमूखपदी, अॅड. राम मेंढे यांची कामगार आघाडी अध्यक्षपदी, राकेश पिंपळकर यांची चंद्रपूर ग्रामीण तालुकाध्यक्षपदी, इमरान खान यांची अल्पसंख्यांक आघाडी घूग्घूस शहराध्यक्षपदी, प्रेम गंगाधरे यांची घूग्घूस तेलगू शहर अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या सर्व नवनियुक्त पदाधिका-र्यांना आज आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. यंग चांदा ब्रिगेड ही सेवा करणारी संघटना आहे. आज नियूक्त झालेल्या पदाधिका-र्यांनी आप - आपल्या क्षेत्रात उल्लेखनीक काम करत शेवटच्या गरजू पर्यत्न पोहचण्याचा प्रयत्न करावा, कोरोना काळात यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने करण्यात आलेले कार्य कौतुकास्पद होते. यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने विविध योजना - उपक्रम राबविल्या जात आहे. हे सर्व उपक्रम यशस्वीरित्या नागरिकापर्यंत पोहचविण्यासाठी सक्रिय कार्यकर्त्त्यांची गरज असून आज नियुक्त झालेले सर्व पदाधिकारी आप आपल्या जबाबदा-या उत्तमरित्या पार पाडतील असा विश्वासही यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी बोलून दाखवीला. या प्रसंगी यंग चांदा ब्रिगेडचे शहर संघटक पंकज गुप्ता, अल्पसंख्यांक विभागाचे शहर प्रमूख सलिम शेख, घूग्घूस शहर संघटक विलास वनकर, करणसिंह बैस, विनोद अनंतवार, विज कामगार संघटनेचे हरमन जोसेफ, तिरुपती कलगुरुवार, राजिक शेख, चंद्रशेखर देशमूख, इमरान शेख, यांच्यासह इतर कार्यकर्त्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
0 comments:
Post a Comment