Ads

पवार साहेब ह्यांच्या वाढदिवसा निमित्य चंद्रपूर शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने वर्चुअल रॅली कार्यक्रम आयोजित करण्यातआला


Honorable Pawar Saheb's Birthday Virtual Rally Program was organized by Chandrapur City District NCP
चंद्रपुर प्रतिनिधी :-आज देशाचे जाणते नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आपल्या सर्वांचे परिचित पद्मविभूषण श्रद्धेय खासदार मा श्री शरदचंद्र पवार साहेब ह्यांच्या वाढदिवसानिमित्य चंद्रपूर शहरातील बाबूपेठ येथील बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे हॉल येथे चंद्रपूर शहर जिल्हाध्यक्ष राजीव कक्कड ह्यांच्या वतीने मुंबई येथून प्रक्षेपण करण्यात आलेली वर्चुअल रॅली घेण्यात आली
सदर वर्चुअल रॅली मध्ये पवार साहेबांच्या वाढदिवसा निमित्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते खा प्रफुल पटेल साहेब ,प्रदेश अध्यक्ष मा ना जयंत पाटील साहेब,उपमुख्यमंत्री अजित दादा पवार सह अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले
आणि हे सर्व मनोगत चंद्रपूर शहर आणि विधानसभेतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी वर्चुअल रॅली च्या माध्यमातून ऐकले, ह्या नंतर आदरणीय पवार साहेब ह्यांचे मार्गदर्शन पर भाषणा ची सुरवात होता च बॅरिस्टर खोब्रागडे हॉल मध्ये वर्चुअल रॅली साठी एकत्र जमलेल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पवार साहेब ह्यांचा जय घोषाचे नारे दिले, पवार साहेबांनी उपस्थित जनतेला मार्गदर्शन करतांना महाराष्ट्रात वर्चुअल रॅली च्या माध्यमातून उपस्थित सर्वांना पक्ष संघटन तसेच सामाजिक बांधिलकी आणि जनसेवेतून पक्ष संघटन वाढविण्या करीता सर्वांना शुभेछ्या दिल्या,
वर्चुअल रॅली ला जेष्ठ नेते बोरकुटे साहेब,रामगुंडे,साहेब,विधानसभा अध्यक्ष सुनील काळे,युवक जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर्,शहर महिला अध्यक्ष शालिनी महाकुलकार, महिला कार्याध्यक्ष चारुशीला बारसागडे, युवक शहर अध्यक्ष प्रदीप रत्नपारखी,विनोद लभाने,महानंदा वाळके,संभाजी खेवले,निमेश मानकर,विपीन झाडे,निसार शेख,माधुरी येरणे, अंजली परकरवार,प्रीती मडावी,देवा धामंगे,रवी वाळके,शुभम प्रजापती,राहुल देवतळे,मुन्ना तेमबुरकर,किसन झाडे, सुरज चव्हाण, अभिनव देशपांडे,केतन जोरगेवार,विपील लभाने तसेच अनेकसुधीर साळवे .माधुरी साळवे. नम्रता रायपुरे. प्रीती लभाने .उमेश मेश्राम. जगन मेश्राम. खुशी जसा. भट्टी प्रवीण. किनाके प्रशांत चिकटे. राजू चिकटे. पदाधिकारी उपस्थित होते
वर्चुअल रॅली मध्ये चंद्रपूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते विधानसभेतील कार्यकर्ते, तसेच चंद्रपूर शहरातील अनेक सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होतेT
चंद्रपूर शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या वर्चुअल रॅली यशस्वी करण्या साठी शहर उपाध्यक्ष विनोद लभाने,माजी नगरसेविका महानंदा वाळके, प्रशांत जुमडे,देवा धामंगे,शुभम प्रजापती,तसेच चंद्रपूर शहराच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment