Ads

वरोरा शहराचे नगराध्यक्ष अहेतेशाम अली यांनी नगराध्यक्षांचा कार्यकाळ यशस्वीपणे पूर्ण केल्याबद्दल मुस्लीम समाजातर्फे सत्कार

Muslim community felicitates Warora Mayor Ahetesham Ali for successfully completing his term as Mayor
वरोरा प्रतिनिधी :-
वरोरा शहराचे नगराध्यक्ष श्री.अहेतेशाम अली त्यांचा नगराध्यक्षांचा स्वरूपाचा पाच वर्षाचा कार्यकाळ यश्स्वीरूपी पूर्ण केल्याबद्दल स्थानिक आर्शीर्वाद मंगल कार्यालयात मुस्लीम समाज बंध्वद्वारे सत्कार सोहळा आयोजित केला गेला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष साहित्यिक विचारवंत तसेच भारतीय मुस्लीम आरक्षण समितीचे प्रमुख प्रो.जावेद पाशा सर उपस्थित होते.
कार्यक्रमाला आनंद निकेतन कॉलेज चे प्रा. श्री.शौकत शाह सर, समाजाचे जेष्ठ नागरिक श्री. गौस मोहम्मद गुरुजी, सामाजीक कार्यकर्ते श्री.शबान शेख,असिफ रजा, यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती. उपस्थित जनसमुदायासोबत संवाद साधित सत्कार कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.पाषा सर म्हणाले कि आपल्या समाजाचा नगराध्यक्ष हा आपल्या साठी समाज भूषण असून तो एक मक़निक असुन त्याची परख आपण सर्वांनी सोनार म्हणून करायला हवी त्यांचा नेतृत्व क्षमतेची प्रशंसा करीत आपल्या समाजाने इतर समाज व त्यांचे नेते यांपासून धडा घेत आहेतेषम अली सारख्या नेत्याचा पाठीमागे एकसंघपणे उभे राहण्याचे महत्व विशद केले. शहराचा ना भूतो ना भविष्यातील कायापलट असे नगराध्यक्ष लाभले हे आपले नशीब असून ते आपले नेतृत्व गुणाची प्रशंसा करीत त्यांना भरभरून शुभेच्छा दिल्या.सत्कारमूर्ती आहेतेषम अलींनी आपल्या सत्काराला उत्तर देत म्हणाले कि आपल्या सर्वांच्या आशीर्वाद व स्नेह मुडेच मी यशाची शिखर पदक्रांत केली असून मी पदावर असो वा नसो समाजासाठी व श्हार्वासियांसाठी आपले उत्तर दायित्व पूर्वी प्रमाणेच पार पाडण्याची ग्वाही दिली.
कर्मचाऱ्यांची यांची कमतरता तसेच कोरोन काळाच्या समस्यांना सोमोर जात शहरातील समस्या दूर करताना अनेक अडचणीचा सामना करावा लागला असून आपल्या आशीर्वाद व सहकार्यानेच हे साध्य झाल्याची कबुली हे अत्यंत भारावलेल्या अंतकरणाने देत सर्व नागरिकांचे तसेच आयोजकांचे आभार व्यक्त केले.
सत्कार कार्यक्रमाचे प्रास्ताविक नियाज सय्यद तर संचालन अझीम शेख यांनी केले. सत्कार समितीचे सदस्य जुबेर कुरेशी,शहीद काजी,बाबू शेख,जावेद शेख,कादर शेख,शोएब शेख,इकलाक रंगरेज,फ़ैइम काझी,अजहर खान,तौर शेख,वासिम शेख,अन्सार शेख,शह्बाज शेख,मुस्ताक शेख,यांनी कार्यक्रमात सफ्लतापुवेक आयोजन केले.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment