चंद्रपुर :- महाआघाडी सरकार द्वारा कष्टकरी ,कामकरी सामान्य व गरिबांच्या पोटात 2 घास उपलब्ध करून देणारी शिवभोजन ही विधायक योजना असून विकलांग सेवा संस्था स्वछता,सुचारु व समर्थपणे शिवभोजन थाळी विद्यार्थी महिला व गोरगरिबांपर्यंत पोचविण्याचे योगदान देत असल्याबद्दल राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर ह्यानी शासनाच्या योजनेचे कौतुक करून विकलांग सेवा संस्था पदाधिकाऱ्यांचे योगदान सहकार्याबद्दल प्रशंशा गौरवोद्गार काढलेत .
लोकनेते शरदचंद्र पवार ह्यांचे वाढदिवसाचे औचित्य साधून भटारकर ह्यानी उपस्थित शिवभोजन लाभार्थ्याना मिठाई चे वितरण केले सोबतच दिव्यांग हितार्थ 2100 ₹ चा मदतनिधी ही संस्था पदाधिकाऱ्यांना प्रदान केला ..
नितिन भटारकर ह्याचे औक्षवन व ग्रंथ व पुष्पगुच्छ देऊन सीमा ठाकूर व प्रसाद पा न्हेरकर ह्यानी त्याचे भावपूर्ण स्वागत केले
कार्यक्रम यशस्वीतेसाठी सीमा ठाकूर,गणेश लटारे खुशाल ठलाल इत्यादींनी सहयोग दिला
0 comments:
Post a Comment