Ads

कोरपना नगरपंचायत निवडणुकीत भाजपाचा विजय निश्चित - हंसराज अहीर

BJP's victory in Korpana Nagar Panchayat elections is certain - Hansraj Ahir
चंद्रपूर :- राजकारणातून समाजकारण ही भारतीय जनता पक्षाची विचारधारा व धोरण आहे. या धोरणानेच पक्षाला लोकांचा विश्वास जिंकता आला. लोकांचा पक्ष ही भाजपाची ओळख असल्याने ही ओळख कायम राखण्याची जबाबदारी आपणा सर्वांची आहे. कोरपना नगरपंचायतीवर भाजपाचा झेंडा फडकवण्यासाठी सर्वांनी अपार मेहणत घ्यावी असे आवाहन पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्राी हंसराज अहीर यांनी दि. 11 डिसेंबर रोजी कोरपना येथे पार पडलेल्या कार्यकत्र्यांच्या बैठकीत केले.
या बैठकीला भाजपा तालुकाध्यक्ष नारायण हिवरकर, भाजपा गडचांदुर शहर अध्यक्ष सतीश उपलंचीवार, राजु घरोटे, किशोर बावणे, अरूण मडावी, पुरूषोत्तम भोंगळे, कवडु जरीले, रमेश मालेकर, नगरसेवक अरूण डोहे, जयाताई धारणकर, भाजपाचे उमेदवार आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.
या बैठकीत हंसराज अहीर यांनी संघटनात्मक कार्याचा आढावा घेतला. नगरपंचायत निवडणुक लढणारे भाजपाचे उमेदवार लोकांच्या विश्वासाला पात्रा ठरतील कोरपना शहराला विकासाचे नवे स्वरूप देण्यात कोणतीही कसर सोडणार नाही असा विश्वास व्यक्त करून पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकत्र्यांनी निवडणुक जिंकण्याच्या भावनेतून प्रचाराची धुरा सांभाळावी अशा सुचना केल्या. या बैठकीस भजपा तालुका पदाधिकारी, महिला, पुरूष व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.

Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment