Ads

हंसराज अहीर यांची उत्तर प्रदेश राज्याचे ओबीसी मोर्चा प्रभारी पदी नियुक्ती

Hansraj Ahir appointed as OBC Morcha in-charge of Uttar Pradesh
चंद्रपूर :-
देशातील सर्वात मोठे राज्य असलेल्या उत्तर प्रदेश राज्याचे ओबीसी मोर्चाचे प्रभारी म्हणून पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्राी तथा भाजपा ओबीसी मोर्चा चे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्री हंसराज अहीर यांना नियुक्त करण्यात आले आहे. लोकसभेत 4 वेळा खासदार, मोदी सरकारमध्ये 5 वर्ष केंद्रीय राज्यमंत्राी, कोळसा घोटाळा उघडकीस आणनारे एकमेव खासदार म्हणुन संपूर्ण देशभर परिचित ठरले असल्याने आगामी 2022 मध्ये होवू घातलेल्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर या नियुक्तीला महत्वपूर्ण मानले जात आहे.
हंसराज अहीर हे अनुभवी राजकारणी असून एक दिग्गज ओबीसी नेतृत्व म्हणून महाराष्ट्रात त्यांची विशेष ओळख आहे. भाजपा महाराष्ट्र प्रदेश तसेच राष्ट्रीय भाजपाच्या माध्यमातून महाराष्ट्र तसेच अन्य राज्यातील महत्वपूर्ण शहरातील मतदार क्षेत्रामध्ये निवडणूकीदरम्यान त्यांचेवर यापूर्वी सुध्दा जबाबदारी सोपविण्यात आली होती हे इथे उल्लेखनिय.
हंसराज अहीर यांच्या नेतृत्वात बहुजनांचे प्रभावी संघटन लोकसभा मतदार संघामध्ये भक्कमपणे उभे राहिले आहे. आश्वासक नेतृत्व व सर्वांना सोबत घेवून राजकीय क्षेत्रात कार्य करणारा संयमी, कर्तृत्ववान नेतृत्व म्हणून ते सर्वपरीचीत आहे. ओबीसी घटकांच्या न्यायहक्कासाठी लढणारे लोकनेते म्हणून त्यांचे कार्य असल्याने केंद्रीय पक्ष नेतृत्वाने त्यांच्यावर ओबीसी मोर्चा च्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली आहे. त्यांनी अल्पावध्ाितच या जबाबदारीला योग्य न्याय देवून महाराष्ट्र राज्यात ओबीसींचे शक्तीशाली संघटन उभे करतांना राष्ट्रीय पातळीवरही हे संघटन मजबूत करण्यात महत्वपूर्ण कामगीरी बजावली आहे.
श्री अहीर यांच्या या संघटनात्मक कार्याची दखल घेत भाजपा राष्ट्रीय ओबीसी मोर्चाने आता त्यांच्यावर ओबीसी मोर्चा चे उत्तर प्रदेश राज्य प्रभारी म्हणून जबाबदारी सोपविली असून त्यांच्या या नियुक्तीचे राज्याचे पूर्व वित्तमंत्राी आ. सुधिर मुनगंटीवार, खासदार अशोक नेते, आ. अशोक उईके, आ. संजीवरेड्डी बोदकुरवार, आ. संदीप धुर्वे, आ. निलय नाईक, आ. बंटी भांगडीया, माजी आमदार अतुल देशकर, संजय धोटे, सुदर्शन निमकर, जि.प. अध्यक्ष संध्याताई गुरनुले, जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, यवतमाळ जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा, राजेंद्र डांगे ,विजय राऊत, खुशाल बोंडे, डाॅ. मंगेश गुलवाडे, जिल्हाध्यक्ष ओबीसी मोर्चा अविनाश पाल, महानगर अध्यक्ष विनोद शेरकी आदिंनी अभिनंदन करुन त्यांना यशस्वी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment