वरोरा(प्रती):- तामिळनाडू कुंनूर येथे गेल्या बुधवारी झालेल्या हेलिकॉप्टर अपघातात देशाचे तिन्ही दलाचे प्रमुख बिपीन रावत त्यांची पत्नी मधूलिका रावत त्यांच्यासह असलेल्या लष्कराच्या११अधिकाऱ्यांना वीर मरण आले होते ,या दुर्घटनेत अवघा देश हळहळला, या वीरांना सर्व राजकीय पक्षीय
व वरोरावासीयाच्या वतीने दि,११/१२/२०२१ रोज शनिवारला श्रद्धांजली वाहण्यात आली सदर कार्येक्रम गांधी चौक येथे पार पडला,
यावेळी ऍड, मोरेश्वर टेमुर्डे,माजी विधानसभा उपाध्यक्ष,अहेतेशाम अली,नगराध्यक्ष, न ,प वरोरा,रामेशजी राजूरकर मनसे नेते तथा ज्येष्ठ उद्योजक,मुकेश जीवतोडे ,शिवसेना जिल्हाध्यक्ष,बाबा भागडे, छोटुभाई शेख, सरलाताई ठमके,लक्ष्मणराव गमे,प्रविण चिमुरकर, रवी तुराणकार उपस्थित होते, सर्व मान्यवरांनी मनोगत व्यक्त करत जनरल बिपीन रावत यांच्यासह शहीद झालेल्या वीरांना आदरांजली वाहिली,कार्येक्रमाचे सूत्र संचालन राजू दोडके यांनी केले, या श्रद्धांजलीच्या कार्येक्रमामध्ये अनेकांनी उपस्थिती दर्शविली,
0 comments:
Post a Comment