भद्रावती(तालुका प्रतिनिधी):-चंद्रपूर येथे पार पडणा-या मेळाव्याकरीता निघालेल्या जुनी पेन्शन संघर्ष यात्रेचे भद्रावतीत स्वागत करण्यात आले.
महाराष्ट्र जुनी पेन्शन
हक्क संघटनेतर्फे दिनांक 22 नोव्हेंबर 2021 पासून आझाद मैदान मुंबई येथून सुरू झालेल्या पेन्शन संघर्ष यात्रेचे आगमन दिनांक 6 डिसेंबर 2021 ला भद्रावती येथे झाले.
यावेळी भद्रावती येथील पेन्शन संघर्ष समन्वय समितीच्या वतीने तालुकाध्यक्ष राहुल बिपटे व इतर सर्व पदाधिकारी यांनी बाळासाहेब ठाकरे प्रवेशद्वार येथे नागपूर चंद्रपूर हाय वे रोड वर भव्य स्वागत करण्यात आले. यावेळी अखिल भारतीय शिक्षक संघाचे अध्यक्ष अजय बोंडे, प्रहार शिक्षक संघटनेचे अध्यक्ष शंकर मिरे, कास्ट्राईब संघटनेचे अध्यक्ष प्रविण थेरकर ,मिलिंद कवाडे ,शिक्षक परिषदेचे अध्यक्ष विनोद बाळेकरमकर व तालुक्यातील सर्व शिक्षक संघटनांचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 comments:
Post a Comment