Ads

जि.प.प्राथ.शाळा , मिंडाळा येथील नविन वर्गखोलीचे लोकार्पण सम्पन्न


नागभीड प्रतिनिधि :- किहैनागभीड तालुक्यातील मिंडाळा येथे जि.प.प्राथमिक शाळेतील नविन वर्गखोलीचे लोकार्पण आमदार बंटीभाऊ भांगडिया यांच्या हस्ते संपन्न झाले. पारडी - मिंडाळा- बाळापुर जिल्हा परिषद क्षेत्रात भाजपा जिल्हा संघटन महामंत्री व जि.प.सदस्य संजय गजपुरे यांच्या पुढाकाराने व पाठपुराव्याने मंजुर झालेल्या विविध विकासकामांचे सध्या लोकार्पण सुरु आहे. जिल्हा निधीतून मंजुर केलेल्या मिंडाळा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या नवीन वर्गखोलीचे लोकार्पण सोहळा नुकताच पार पडला. यावेळी जि.प.सदस्य संजय गजपुरे व पं.स.सदस्य संतोष रडके यांची प्रमुख उपस्थिती होती.
पारडी - मिंडाळा - बाळापुर जिल्हा परिषद क्षेत्रात संजय गजपुरे यांनी आपल्या कार्यकाळात विकासाला नवी दिशा दिल्याचे प्रतिपादन करीत विविध निधींमधुन त्यांनी विकासकामे खेचून आणल्याचे आमदार बंटीभाऊ भांगडिया यांनी सांगितले व यापुढेही या क्षेत्रासाठी निधीची कमतरता होऊ देणार नसल्याचे आश्वासन दिले. याप्रसंगी जि.प.सदस्य संजय गजपुरे यांनी क्षेत्रातील जनतेच्या सहकार्यातुनच ही विकासकामे पुर्णत्वास नेऊ शकलो असे विनम्रपणे सांगितले . मिंडाळा चे सरपंच गणेश गड्डमवार यांनी प्रास्ताविकात गावच्या समस्या विषद केल्या.
याप्रसंगी मंचावर कृ.उ.बा. समिती सभापती आवेश पठाण, उपाध्यक्ष न.प. नागभीड गणेश तर्वेकर, बांधकाम सभापती न.प. नागभीड सचिन आकुलवार, भाजपा युवा नेते चिमूर समीर राचलवार, सरपंच ग्रा.पं. मिंडाळा गणेश गड्डमवार, माजी उपसरपंच ग्रा.पं. मिंडाळा श्री.विनोद हजारे, नगरसेवक शिरीष वानखेडे, माजी जि.प.सभापती ईश्वर मेश्राम, अशोक समर्थ , शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शेंडे , शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र हटवार सर यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे संचालन सहा.शिक्षक केवळराम मैंद सर यांनी केले तर उपस्थितांचे आभार शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र हटवार सर यांनी मानले . याप्रसंगी भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते , ग्रामस्थ व विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
===============
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment