चंद्रपुर :- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेवर हा देश चालत आहे. बाबासाहेब यांनी दिलेल्या दिशेमूळेच आमच्या सारखे असंख्य लोक राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात पुढे जात आहे. महामानव यांनी देशाला दिलेल्या स्वातंत्र समता, बंधूत्व या त्रि-सुत्रामुळे देश सर्व घटकांना समान न्याय देण्यास सक्षम ठरत असून महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राज्यघटनेमुळे देश एकसंघ राहिला असल्याची भावना आमदार किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केली.
आमदार किशोर जोरगेवार यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पूष्पचक्र अर्पण करून त्यांना अभिवादन केले. यावेळी यंग चांदा ब्रिगेडच्या विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अजय दूर्गे, आनंद इंगळे, पुण्यवर्धन मेश्राम, कलाकार मल्लारप, पंकज गुप्ता, जितेश कुळमेथे, अमोल शेंडे, सुधिर माजरे, नकुल वासमवार, नितीन शाहा, तापूष डे, अॅड. राम मेंढे, प्रतिक शिवणकर, सलिम शेख, रुपेश कुंदोजवार, आदींची उपस्थिती होती.
यावेळी आ. जोरगेवार म्हणाले की, भारतीय समाजाला जडलेला जातीव्यवस्थेचा आजार मुळापासून उखडून टाकल्या शिवाय समाजाची आणि पर्यायाने भारताची प्रगती होणार नाही अशी त्यांची धारणा होती. ते एक कृतिशील महापुरुष होते. त्यांनी सांगितलेल्या विचारांनीच देश समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन पुढे जाऊ शकतो असेही ते यावेळी म्हणाले.
0 comments:
Post a Comment