चंद्रपुर :- गोंडवाना विद्यापीठाने नुकताच जाहिर केलेल्या परिपत्रक नुसार विद्यापीठाची होणारी हिवाळी २०२१ परीक्षा हि ऑफलाइन (mcq pattern) पध्दतीने होईल.विद्यापीठाच्या ह्या निर्णयामुळे संपूर्ण विद्यार्थी वर्गामधे संभ्रम निर्माण झालेला आहे.कारण, एकीकडे कोविड-१९ मुळे उद्द्भवलेली परिस्थिती व सुरु असलेले आभासी पद्धतीचे शिक्षण व ऑनलाइन शिकवनी यामुळे आता कमी वेळात ऑफलाइन परीक्षेची तयारी कशा पध्दतीने करावी असा प्रश्न सर्व विद्यार्थ्यांच्या पुढे उभा आहे.सर्व विद्यार्थी वर्गासोबत चर्चा केली असता, ऑफलाइन पद्धतीने परीक्षा झाल्यास विद्यार्थ्यांना अनेक अडचणीचा सामना करावा लागेल.त्यामुळे गोंडवाना विद्यापीठाने हा निर्णय मागे घ्यावा व होणारी हिवाळी-२०२१ परीक्षा हि ऑनलाइन पध्दतीने घेण्यात यावी या मागणी सहित आज यंग थिंकर्स चंद्रपुर (एन.बी.एस.एस) च्या चमु तर्फे सरदार पटेल महाविद्यालय चंद्रपुरचे प्राचार्य मा. प्रमोद काटकर सर यांना निवेदन देण्यात आले व महाविद्यालयाच्या माध्यमातून गोंडवाना विद्यापीठाला मागणी करण्यात आली. यावेळी यंग थिंकर्स चंद्रपुर (एन.बी.एस.एस) चे कार्यकर्ते व सरदार पटेल महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते.प्रामुख्याने निशिकांत आष्टनकर,खेमराज भलवे,मंदार झाडे,राजेश हजारे,विश्वजीत नायक,मयुर नांदे,ओमकार तपासे,कुणाल कोकुले,प्रणय चन्ने,प्रीत पराते इत्यादी उपस्थित होते.
Home
chandrapur
यंग थिंकर्स चंद्रपुर (एन.बी.एस.एस) तर्फे गोंडवाना विद्यापीठ हिवाळी २०२१ ची होणारी परीक्षा ऑनलाइन पध्दतीने घेण्याची मागणी.
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
0 comments:
Post a Comment