भद्रावती : येथील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र आणि विवेकानंद महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालय परिसरात 15 ते 18 वयोगटातील 171 विद्यार्थी विद्यार्थीनींचे लसीकरण करण्यात आले. कोवीड नियमांचे पालन करून घेतलेल्या या लसीकरण मोहिमेत महाविद्यालयातील विद्यार्थीनी व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. या लसीकरणाच्या यशस्वीतेसाठी नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रातून आलेल्या तालुका आरोग्य अधिकारी रोशन खलील शेख, विशाल गुरनुले, ममता नागपुरे, उर्मिला वानखेडे, उर्वशी लोखंडे यांनी डॉ. दीप्ती मोहितकर यांच्या मार्गदर्शनात यशस्वी लशीकरण केले. या लसीकरणाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य डॉ. नामदेव उमाटे यांच्या मार्गदर्शनात रासेयो कार्यक्रम अधिकारी डाॅ. रमेश पारेलवार, डॉ. उत्तम घोसरे, डॉ. प्रकाश चित्रे, प्रा.मोहित सावे, डॉ. यशवंत घुमे, प्रा. श्रीकांत दाते, प्रा. अनिल बलकी,प्रा. धनंजय बेलगावकर इत्यादींनी परिश्रम घेतले.
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
0 comments:
Post a Comment