चंद्रपूर : एसटी बस दोन महीन्यापेक्षा अधिक कालावधीपासून बंद असल्याने अधिकचा नफा कमविण्याच्या हेतूने प्रवाशांचा जीव वाहन चालक टांगणीला लावत आहे. चंद्रपूर जिल्ह्यातून धावणाऱ्या खाजगी ट्रॅव्हल्सच्या वेगावर नियंत्रण ठेवा, असे निर्देश देणारे पत्र खासदार बाळू धानोरकर यांनी प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे व सहाय्यक पोलीस निरीक्षक, महामार्ग पोलीस केंद्र श्री. खैरकर तसेच पोलीस निरीक्षक वाहतूक नियंत्रण शाखा चंद्रपूर यांना दिले.
चंद्रपूर जिल्ह्यातून चंद्रपुर - नागपुर , चंद्रपुर - गडचिरोली , चंद्रपूर- ब्रम्हपुरी तसेच चंद्रपूर पुणे मार्गावर जाणा - या अनेक खासगी ट्रॅव्हल्स कार्यरत आहेत. एसटी बस सेवा बंद असल्याचा फायदा घेत खासगी ट्रॅव्हल्स सुसाट वेगाने धावू लागले आहेत. यातच काल शुक्रवारी वरोरा येथे अपघात घडला. यात दोन प्रवाशांचे जिव गेले तर अन्य प्रवाशी गंभीर जखमी झाले. या मार्गावरून जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स वेगात असतांना देखील स्पिड गणच्या माध्यमातून चालान होण्याचे प्रमाण कमी का आहे, असा प्रश्नही खासदार बाळू धानोरकर यांनी विचारला आहे.
चंद्रपूर रामनगर पोलिस स्टेशन समोर देखील मागील आठवड्यात आपघात झाला आहे. तसेच नागपूर रोड पाणी टाकीजवळ रस्त्यांचा दोन्ही बाजुला ट्रॅव्हल्स उभ्या असतात . त्यामुळे तीथे देखील अनेक अपघात घडून देखील त्या ठिकाणी खासगी ट्रॅव्हल्स मालकांवर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. खासगी ट्रॅव्हल्स च्या वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी तात्काळ उपायोजना करावे तसेच आजवर अनियंत्रीत वेगासाठी किती खासगी ट्रॅव्हल्सवर कारवाई केली, याची माहीती तात्काळ कार्यालयात सादर करावी, अशी सूचना खासदार तथा रस्ता सुरक्षा समिती अध्यक्ष बाळू धानोरकर यांनी केली आहे.
--
0 comments:
Post a Comment