चंद्रपुर ;- १२ जानेवारी २०२२ राष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधुन यंग थिंकर्स चंद्रपुर तर्फे दिनांक ०६ ते १० जानेवारी या दरम्यान घेण्यात आलेल्या ऑनलाइन प्रश्न-उत्तर/चित्रकला/भाषण स्पर्धा या सर्व स्पर्धांचा बक्षीस वितरण कार्यक्रम आयोजीत करण्यात आला.मान्यवरांचे हस्ते वंदनीय राजमाता जिजाऊ साहेब व स्वामी विवेकानंदजी यांच्या जयंती निमित्त्य विनम्र अभिवादन करीत प्रतिमा-पुजन व दिप-प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणुन सुप्रसिद्ध मा.डॉ.स्नेहल पोटदुखे मैडम,एन.बी.एस.एस चंद्रपुरचे उपाध्यक्ष तथा चांदा जिल्हा संताजी शिक्षण प्रसारक मंडळ चंद्रपुरचे सचिव मा.रमेशजी भूते,एन.बी.एस.एस चंद्रपुरचे सचिव मा.उमेशजी आष्टनकर हे मान्यवर लाभले.कार्यक्रमाची प्रास्ताविक यंग थिंकर्सचे सदस्य निशिकांत आष्टनकर यांनी सादर केली.या सोबतच यंग थिंकर्सचे सदस्य रोशनी नगपुरे व राजेश हजारे यांनी राजमाता जिजाऊ साहेब व स्वामी विवेकानंदजी यांचे विचार व कार्य यावर आपले मनोगत व्यक्त केले.विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन शुभम निंबाळकर सदस्य यंग थिंकर्स चंद्रपुर यांनी केले.सम्पुर्ण कार्यक्रमाचे सुंदर असे सूत्र-संचालन प्रनिशा जुमडे सदस्य यंग थिंकर्स यांनी केले. याप्रसंगी सर्व स्पर्धक,युवा वर्ग पालक वर्ग उपस्थित होते.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजन समिती मधे यंग थिंकर्स चंद्रपुर चे सर्व सदस्य प्रामुख्याने आकाश वानखेडे,मंदार झाडे,खेमराज भलवे,सुमेधा वैद्य,मिनल मोदी हे उपस्थित होते.
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
0 comments:
Post a Comment