राजुरा : शहरालगत तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळखल्या जात असलेल्या रामपूर येथे उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या उपसरपंच पदाच्या निवडणुकीत आघाडीच्या सुनीता मधुकर उरकुडे यांचा एक मताने विजय झाला आहे.
रामपूर ग्रामपंचायतीच्या माजी उपसरपंच हेमलताताई ताकसांडे यांनी अगोदर ठरविल्याप्रमाणे अडीच वर्षे कालावधी पूर्ण झाल्याने उपसरपंच पदाचा राजीनामा दिला. या रिक्त जागेवर (दि. १४) उपसरपंच पदासाठी मतदान घेण्यात आले यावेळी काँग्रेस-शिवसेना यांचेकडून अनिता आडे यांनी आवेदनपत्र सादर केले तर, शेतकरी संघटना-भाजपा-राकांपा कडून सुनीता मधुकर उरकुडे यांनी आवेदनपत्र सादर केले. मतदान करताना एक मतदान नोटा ला व दोन्ही उमेदवारांना ५-५ समान मते मिळाली असता सरपंच वंदनाताई गौरकार यांनी निर्णायक मतदान केल्यामुळे सुनीता उरकुडे या एक मंतांनी विजयी झाल्या. यावेळी मतदानात सरपंच वंदनाताई गौरकर, माजी उपसरपंच हेमताताई ताकसांडे, सुनीता उरकुडे, सिंधुताई लोहे, शीतल मालेकर, संगीता विधाते, लक्ष्मी चौधरी, अनिता आडे, लताताई डकरे, विलास कोदिरपाल, रमेश झाडे, जगदीश बुटले यांनी सहभाग घेतला. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून विस्तार अधिकारी चुने यांनी काम पाहिले.
शिवसेना-काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती, तोडाफोडीच्या राजकारणात आघाडीच्या गटातील एका सदस्याला उपसरपंच पदाचे आमिष दाखवीत आपल्या गटात घेऊन उपसरपंच पदाचे उमेदवार म्हणून उभे केले मात्र मतदान करतांना यांच्यातील एका सदस्याचे मतदान अपात्र ठरल्याने सेना-काँग्रेस यांच्यावर नामुष्की ओढवली पर्यायाने सरपंचांनी निर्णायक मतदान करीत आघाडीच्या सुनीता उरकुडे यांना विजयी केले.
यावेळी रमेश गौरकार, सुरेश झाडे, सिंधुताई लांडे, राहुल बानकर, नामदेवराव गौरकार, रामचंद्र घटे, मारोती जानवे, मधुकर उरकुडे, बाबुराव जंपलवार, प्रवीण हिंगाने, प्रभाकर लडके, शंकर उरकुडे आदींनी परिश्रम घेतले. या निवडीबद्दल माजी आमदार वामनराव चटप, संजय धोटे, सुदर्शन निमकर, कृषी व पशुसंवर्धन सभापती सुनील उरकुडे सतीश धोटे यांनी अभिनंदन केले.
0 comments:
Post a Comment