Ads

दिव्यांगाना स्वयंरोजगारासाठी जागा उपलब्ध करुन दया - आ. किशोर जोरगेवार

चंद्रपुर :-दिव्यांग बांधवांना स्वंयरोजगारातून आर्थिक सक्षम करण्याच्या दिशेने आमचे प्रयत्न सुरु आहे. यासाठी मनपानेही पूढाकार घ्यावा, दिव्यांग बांधवांच्या स्वयंरोजगारासाठी लागणारा स्टॉल, हातठेला आम्ही उपलब्ध करुन देणार आहोत. मनपाने यासाठी जागा उपलब्ध करुन दयावी अशा सुचना आमदार किशोर जोरगेवार यांनी मनपा आयुक्त विपीन पालीवाल यांना केल्या आहे.
मनपातील कामाचा आढावा व कोरोना बाबत उपयोजनाचा आढावा घेण्यासाठी आमदार किशोर जोरगेवार यांनी मनपा अधिका-यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत आमदार किशोर जोरगेवार यांनी सदर सुचना केली आहे. शासकीय विश्राम गृहात आयोजीत या बैठकीला मनपा आयुक्त विपीन पालीवाल, मनपा आरोग्य अधिकारी वनीता गर्गेलवार, शहर अभियंता महेश बारई, नगर रचनाकार दहिकर, उप नगर रचनाकार दयादीप मांडवगडे, अभियंता रविंद्र हजारे, अभियंता सौरभ गौतम आदि अधिका-र्यांची उपस्थिती होती.
दिव्यांग बांधव हा देखील समाजाचा घटक आहे. त्यामूळे त्यांच्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. गरजू दिव्यांग बांधवांना आर्थिक सक्षम करण्याच्या दिशेने माझे प्रयत्न सुरु आहे. अशा दिव्यांगांना स्वयंरोजगारासाठी आपण प्रेरित करत आहोत. यासाठी लागणारा स्टॉल अथवा हातठेला आपण स्वखर्चातून त्यांना उपलब्ध करुन देणाचे नियोजन केले आहे. मात्र सदर ठेवा लावण्यासाठी महानगरपालिकेने त्यांना जागा उपलब्ध करुन द्यावी अशी सुचना या बैठकीत आ. जोरगेवार यांनी केली आहे. सोबतच कोरोनाची वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता उपायोजना करा, आरोग्य सुविधा सुधारण्याकरिता मनपाचे प्राथमिक आरोग्य केंद्र अद्यावत करा अशा सुचनाही यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी मनपा अधिका-र्यांना केल्यात. सर्व सोयी सुविधायुक्त अग्नीशमनचे दोन वाहने उपलब्घ करण्यात यावीत, जटपूरा गेटची वाहतुक कोंडी दुर करण्यासाठी प्रायोगिक तत्वावर पर्यायी मार्ग सुरु करण्यात यावा, बाबूपेठ येथील स्मशान भुमी विकसीत करण्यात यावी, कोहिणूर तलावाचे सौंदर्यीकरण करण्यात यावे, यासह अनेक सुचना यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी मनपा प्रशासनाला केल्या आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment